• Mon. Nov 25th, 2024

    मराठा तरुणांचा आरक्षणाप्रश्नी घेराव, युगेंद्र पवारांच्या दौऱ्याला विरोध, आरक्षण दिल्यावरच गावात या…

    मराठा तरुणांचा आरक्षणाप्रश्नी घेराव, युगेंद्र पवारांच्या दौऱ्याला विरोध, आरक्षण दिल्यावरच गावात या…

    बारामती (पुणे) : बारामती : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यात अजित पवार यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार हे आपल्या आजोबांच्या बाजूने उभे राहिले असून ते आपल्या आत्याचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसर त्यांनी आता गाव दौरे सुरू केले आहेत. त्यात आज बारामती तालुक्यातील उंडवडी येथे गाव भेट दौऱ्यावर असताना त्यांना सकल मराठा समाजाच्या तरुणांनी त्यांना आरक्षणाबाबत जाब विचारला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे बारामती तालुक्यातील खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी गाव भेट दौरे करत आहेत. उंडवडी सुपे गावात ते गेल्यानंतर सकल मराठा समाजाच्या तरुणांनी त्यांना आरक्षणाबाबत जाब विचारला. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही गाव भेट दौरे करू नयेत अशा सूचना देखील तरुणांनी यावेळी युगेंद्र पवार यांना केल्या.
    सख्ख्या काकाला सोडून युगेंद्र पवार चुलत आत्या-आजोबांच्या साथीला, बारामतीत भेटीगाठींना वेग

    योगेंद्र पवार यांनी आपल्या आत्याचा प्रचार गावागावात जाऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यानुसार त्यांनी गाव भेट दौरे सुरू केले आहेत. नागरिकांच्या भेटी सुरू असताना सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी योगेंद्र पवार यांना घेराव घालत जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण गावभेट दौरे करू नयेत असे आवाहन केले. त्यावर योगेंद्र पवार यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसून लवकर यावर ते माध्यमांशी बोलणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र आज पहिल्याच दिवशी असा प्रकार घडल्याने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर युगेंद्र पवार काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *