अमित शाह काय म्हणाले?
“बाळासाहेब ठाकरेंना फक्त महाराष्ट्र नाही तर देशातील जनता मानते ती फक्त त्यांच्या सिद्धांतांमुळे मानते. छत्रपती संभाजीनगरच्या नावाला विरोध करणारे बाळासाहेबांचे वारस असू शकतात का? उद्धव ठाकरेंना लाज वाटायला पाहिजे तुम्ही ज्यांच्या जवळ, ज्यांच्यासोबत बसले आहात त्यांनी ३७० हटवण्यासाठी विरोध केलेला, सर्जिकल स्ट्राइकसाठी विरोध केलेला, औरंगाबादचं संभाजीनगर होण्याचा मार्ग थांबवून ठेवला होता. राम मंदिराल विरोध केला मग तुम्ही त्यांच्यासोबत कसं राहू शकता, कोणत्या तोंडाने तुम्ही राज्याच्या जनतेपुढे येणार. हे लोक सिद्धांताचं राजकारण करत नाहीत, देशाचं राजकारण करत नाहीत, हे लोक कुटुंबाचं राजकारण करतात”, असं म्हणत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.
परिवारवादी युतीचं लक्ष काय तर सोनिया गांधीला राहुल गांधीला पंतप्रधान करायचं आहे. शरद पवार यांना स्वतःच्या मुलीला मुख्यमंत्री करायचं, तर उध्दव ठाकरे यांना मुलगा आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचं आहे. मग हे लोक देशाचं भविष्य काय घडवणार आहेत? देशात हे काम मोदींच्या नेतृत्वात भाजपच करु शकते असं अमित शाह म्हणाले.
२०१४-१९ मध्ये आम्ही झोळी केली तेव्हा आम्हाला लोकांनी ५० टक्के मतं दिली. शहराने एक चूक केली. इतिहासानंतर पुन्हा मजलिस येथे बसली. हे तुम्हाला मान्य आहे का? या लोकांना जागेवर बसवायचं आहे. यावेळी ४५ पेक्षा ज्यात जागा द्यायच्या आहे .महाराष्ट्राचा आमच्याकडे दहा वर्षांच्या ट्रॅक आहे. पुढच्या २५ वर्षाच्या मॅप आहे, असंही शाह यांनी सांगितलं.
मोदी सरकारने अर्थव्यवस्था १० वर्षात ११ नंबर वरून ५ व्या क्रमांकावर आणली आहे. तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान केलं तर अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर नक्की येईल.
मोदी एक मात्र नेता आहे ज्यांना १५ देशांनी सर्वोच्च पुरस्कार दिला. हा पक्षाचा नाहीत तर देशाचा सन्मान आहे. मोदी कुठेही कोणत्याही देशात जाऊद्या ते भारतीय भाषेत बोलून देशाचा सन्मान वाढवत आहे, असंही शाह म्हणाले.