• Sat. Sep 21st, 2024

सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट

सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर संग्राम थोपटेंनी सगळं क्लिअर केलं, लोकसभेबाबत भूमिका स्पष्ट

पुणे: अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी माजी आमदार अनंतराव थोपटे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होतं की, आता थोपटे कुटुंबीय हे सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार, अशी चर्चा होती. मात्र, यावर स्वतः आमदार थोपटे यांनी पडदा टाकला आहे. मी सुप्रियाताईंसोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

भोर येथे महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संग्राम थोपटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी घेतलेली भेट ही घरगुती असल्याचे समोर आले.

अनंतराव थोपटे आणि शरद पवार हे एकमेकांचे राजकीय विरोधक असल्याचे संपूर्ण राज्याला माहीत आहे. मात्र भोर, वेल्हा, मुळशी हा विधानसभा मतदार संघ बारामती लोकसभा मतदार संघात येत असल्याने सुप्रिया सुळे यांचा छुपा प्रचार थोपटे यांनी केल्याची चर्चा आहे. मात्र सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. मात्र, संग्राम थोपटे यांनी या भेटीवर पडदा टाकला आहे.

बारामती लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी मताधिक्य घेणे आवश्यक आहे. हे मताधिक्य घेण्यासाठी स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच त्यांनी थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली होती. मात्र सुनेत्रा पवार यांच्या भेटीवर संग्राम थोपटे यांनी पडदा टाकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed