• Sat. Sep 21st, 2024

मनसेचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये, मनसैनिकांनी जय्यत तयारी सुरु

मनसेचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये, मनसैनिकांनी जय्यत तयारी सुरु

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन येत्या ९ मार्च रोजी साजरा होत आहे. यंदा राज ठाकरे यांच्या आदेशाने हा वर्धापनदिन सोहळा नाशिक शहरात आयोजित केला जात आहे. नाशिक हा मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. या सोहळ्याचा निमित्ताने राज ठाकरे, अमित ठाकरे तसेच मनसेची राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळी ७ मार्च रोजी नाशिक शहरात दाखल होणार आहेत.

राज ठाकरेंकडून नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती

मनसेप्रमुख राज ठाकरे हे पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला काळाराम मंदिरात आरती करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर शहरातील मनसेच्या कार्यालयाचे तसेच शाखांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींना बॉम्बने उडवून देऊ, नाशिक पोलिसांना कॉल, तपासात वेगळंच सत्य समोर
९ मार्च रोजी मुंबई नाका परिसरात असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ९ वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी पक्षाचे नेते मंडळी मनसैनिकांना मार्गदर्शन करतील. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात काय भूमिका मांडणार याकडे मनसैनिकांसह राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय.
राज ठाकरे पुण्यातून बैठकीविनाच परतले, पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे संतापल्याची चर्चा
दरम्यान, संपूर्ण नाशिक शहरात मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली असून नाशिकरांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित रहावे असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
बहुचर्चित ‘गोदा पार्क’ला पुन्हा येणार ‘अच्छे दिन’, मनसे-भाजप युतीच्या चर्चेदरम्यानच ‘नमामि गोदा’त समावेश

मनसे नाशिक लोकसभा लढवणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिककरांनी महापालिकेची एकहाती सत्ता दिली होती. नाशिक महापालिकेत सत्ता असताना मनसेकडून विविध उपक्रम राबवण्यात आले होते. आता मनसेला नाशिकची जागा लढवू शकते अशी चर्चा आहे. राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु ठेवली आहे. आगामी काळात मनसे राज्याच्या राजकारणात एकला चलोची भूमिका घेणार की युती करणार का याकडे लक्ष लागलं आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतरच्या लोकसभा निवडणुका पक्षाकडून लढवण्यात आल्या. पण, मनसेचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. आता पक्षाचा १८ वा वर्धापन दिन असताना आणि याच वर्षी निवडणुका होत असल्यानं मनसेला पहिला खासदार मिळेल का हे देखील पाहणं आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed