• Mon. Nov 25th, 2024
    गायकवाडांकडून तरुणाला मारहाण; पत्रकार परिषद घेत शिंदेंचे आमदार म्हणतात, जराही पश्चाताप नाही

    बुलढाणा : शिवजयंतीच्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी एका युवकावर केलेल्या अमानुषपणे केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. त्यावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? हे सांगण्याकरता आज बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी आपली पत्रकार परिषद घेतली.आमदार संजय गायकवाड म्हणाले की, ”शिवजयंती मिरवणुकीमध्ये काही मुलं नशेमध्ये होते. त्यांनी गांजा ओढला होता. ते मिरवणुकीत वावरत असताना त्यांच्या हातात शस्त्र देखील होते. काही महिलांनी माझ्याकडे या तरुणांबद्दल तक्रार केल्यानंतर मी त्या तरुणांचा पाठलाग करत असताना त्या टोळक्यांनी माझ्या अंगरक्षकावर हल्ला केला. माझ्या अंगरक्षकावर हल्ला करत त्यांना खाली पाडले, हे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर परिस्थिती हाताळण्याकरता त्या तरुणांना माझ्या हातून मारहाण करावी लागली. कारण, ३० ते ४० हजार लोकांच्या गर्दीमध्ये महिला देखील होत्या. मी त्या युवकाला मारहाण केली, त्या कृत्याचा मला जराही पश्चाताप नाही” असंही गायकवाड म्हणाले.
    अजितदादा म्हणतील PMC कशाला, खातंच द्या; पण ते देणार नाही, माझ्याकडेच ठेवेन, फडणवीसांची कोपरखळी
    ”शिवजजयंती आयोजन समितीमध्ये मी अध्यश असल्याने या विश्वासाने त्या महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांची सुरक्षा करणे माझं प्रथम कर्तव्य होतं. काही जणांनी मला तिथे प्रशासन असताना आपण कायदा हातात का घेतला? असा सवाल देखील केला”. यावर गायकवाड म्हणाले की, ”मी पोलिसांची वाट पाहत असतो आणि किंबहुना पोलीस प्रशासन हा प्रकार नियंत्रणात ठेवू शकले असते तर गावामध्ये गांजा आणि अवैध टोळके तयार झाले नसते. त्यामुळे यापुढे देखील अशी परिस्थिती निर्माण झाल्यास मला आधी तिथली सुरक्षा महत्त्वाची आहे”, असंही संजय गायकवाड म्हणाले.

    काही दिवसांपूर्वी संजय गायकवाडांनी वक्तव्य केलं होतं की, मी एका वाघाची शिकार केली होती आणि त्याचा दात माझ्या गळ्यामध्ये बांधला आहे. याबाबत देखील त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, ”हे सर्व काही खरं नाही. तसेच ज्या महिलेने शेती बळकावल्याच्या प्रकरणी तक्रार केली होती, त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. तो देखील विषय संपला आहे. त्यामुळे आता सगळे विषय संपले आहे”, असं देखील संजय गायकवाडांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *