• Mon. Nov 25th, 2024
    शेवंतीच्या झाडाला लागूनच अफूची शेती; पोलिसांची थेट शेतात कारवाई, दोघांना अटक

    पुणे: जिल्ह्यात अफूची शेती केल्याचे अनेक प्रकार दिवसेंदिवस घडताना आपल्याला पाहायला मिळतं आहेत. त्यात पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरात अफूची शेती केल्याची घटना समोर आली आहे. १० किलो अफू लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी छापा टाकत ही झाडे जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
    रस्त्याशेजारी दोन गोण्या, उघडून पाहताच पोलिस सुन्न, गर्भवती महिलेसोबत जे घडलं ते वाचून हादराल
    मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ सिताराम बडदे आणि तानाजी निवृत्ती बडधे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस शिपाई धीरज जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक येथील मलाईवस्ती परिसरात दोन व्यक्तींनी शेतात अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी शेतात शेवंतीच्या झाडाला लागूनच अफूची लागवड केल्याचे दिसले.

    फुलांची उधळण, ढोल आणि बॅनर… सुनेत्रा पवारांचं बारामतीत क्रेन द्वारे भल्या मोठ्या हाराने स्वागत!

    पोलिसांनी याची माहिती घेत शेतातून ८ किलो अफूची झाडे जप्त केली. त्यानंतर दशरथ बडदे यांनी कांद्याच्या शेतात अफूची लागवड केल्याचे दिसले. शेतातून २ किलो ५०० ग्रॅम असलेली ही बोंडे प्रतिकिलो २००० रुपये दराने विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केलेली मिळून आली. या दोन इसमांनी आपल्या शेतात अफूची बेकायदेशीर लागवड केली होती. या छाप्यात एकूण दहा झाडे जप्त करण्यात आली आहेत. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे हे करीत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed