• Sat. Sep 21st, 2024
गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम, कपिल पाटलांवर सुषमा अंधारेंचं टीकास्त्र

शहापूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या भिवंडी लोकसभा मतदारसंघात आल्या होत्या. त्यांनी मंगळवारीही भाषण करत खासदार कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शाब्दिक हल्ला केला आहे.
रोहित पवारांवर गुन्हा दाखल होणारच, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पुनरुच्चार
अंधारे म्हणाल्या की, गर्दी जमत नाही म्हणून त्यांनी वेगळा फंडा वापरला आहे. कपिल पाटील यांना गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवावा लागतो. गौतमी पाटीलने गाणं म्हणायचं पाटलाचा बैलगाडा आणि शिंदे फडणवीसांनी महाराष्ट्रात सुरु केला राडा. सगळ्या राजकारणाचा चिखल करुन टाकला आहे.”असं म्हणत सुषमा अंधारेंनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरुन कपिल पाटील आणि भाजपवर टीका केली आहे.कल्याण लोकसभेत ठाकरे गटाकडून अंधारे यांचे नाव चर्चेत आहे. याविषयी त्या म्हणाल्या, माझं नाव चर्चेत पण मला अधिकृत निरोप नाही. मला फक्त काम करायचे आहे. मुक्त संवाद अभियानाच्या माध्यमातून मी या रुटने आले आहे. माझ्या पक्षाने मला सांगितले तर मी वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल. तुम्हाला असे का वाटते की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठा अडचणींचा डोंगर आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तो अडचणींचा डोंगर आहे. परंतू आम्हाला ते फार मोठे आव्हान वाटत नाहीत.

फुलांची उधळण, ढोल आणि बॅनर… सुनेत्रा पवारांचं बारामतीत क्रेन द्वारे भल्या मोठ्या हाराने स्वागत!

कल्याणमधील वाढती गुन्हेगारी, अस्वस्थता, ठेकेदार, पोलीस यंत्रणा दहशतीखाली आहे. येथे सत्ताधाऱ्यांमधील गॅंगवॉर शिगेला पोहोचला आहे. तर मला असे निश्चित वाटते की येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोप्पी असणार नाही. जितकं सोप्पं त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे. कारण मुख्यमंत्री स्वतःच प्रोजक्शन कितीही शेतकरी पुत्र म्हणून करत असले, तरी श्रीकांत यांचे प्रोजेक्शन ते शेतकरी पुत्र म्हणून करु शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed