• Sat. Sep 21st, 2024
कुणाला किती जागा? कोण कुठे लढणार? बैठकीनंतर राऊतांनी काय काय सांगितलं?

मुंबई : “आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भाने महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वंचितसह जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला असून चारही पक्षाच्या प्रमुखांच्या अखेरच्या बैठकीनंतर त्याची घोषणा केली जाईल”, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. त्याचवेळी महाविकास आघाडीकडून मनोज जरांगे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात वंचितकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडीचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत लोकसभेच्या ४८ जागांवर एकमत झाल्याची माहिती दिली. आजच्या बैठकीत संपूर्ण ४८ मतदारसंघांवर चर्चा करून कोण कुठे लढणार यावरही सखोल चर्चा झाल्याची माहिती राऊत यांनी दिली.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार दूरध्वनीवरून आजच्या बैठकीतील माहिती घेत होते

संजय राऊत म्हणाले, “आजची बैठक निर्णायक झाली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार दूरध्वनीवरून आजच्या बैठकीतील माहिती घेत होते. तिन्ही पक्षांचं जागावाटप अत्यंत सुरळितपणे पार पडलं आहे. याक्षणी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. वंचितचा प्रस्ताव दिसायला मोठा कागद दिसत असला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी त्या मतदारसंघात त्यांनी काम केलं आहे. त्याच्यावर आम्ही सगळे मिळून आम्ही चर्चा करू. शेवटी आम्हा सगळ्यांचा लोकशाही, संविधान, वंचितांचं रक्षण करण्याचा अजेंडा आहे”.
मनोज जरांगेंना जालन्यातून उमेदवारी द्या, लोकसभेला किमान १५ ओबीसी उमेदवार, वंचितचा मविआला प्रस्ताव!

कोण किती जागा लढणार यावर बोलताना राऊत म्हणाले, “कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात लढणार हे निश्चित झालेले आहे. परंतु कोण कुठे लढणार यापेक्षा तिथे जिंकणे महत्त्वाचे आहे. किती जागा लढणार हा मुद्दा आमच्यादृष्टीने महत्त्वाचा नाही”.
शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात जागा वाटपासंदर्भात चर्चा, किती जागा जिंकू शकतो ते ही सांगितलं!

वंचितच्या प्रस्तावावर राऊत काय म्हणाले?

वंचितने दिलेल्या प्रस्तावावर राऊत म्हणाले, “वंचितचा प्रस्ताव दिसायला मोठा कागद दिसत असला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी त्या मतदारसंघात त्यांनी काम केलं आहे. तरीही वंचितने २७ जागांचा फॉर्म्युला आम्हाला दिलेला नाही. यासंबंधाने येणाऱ्या बातम्यांत कोणतेही तथ्य नाही. जिथे ज्याची जास्त ताकद तिथे त्याला संधी देण्याचा आमचा विचार आहे”.
मविआचं जागावाटप कधी? किती जागा कुणाला? महत्वाची माहिती समोर, काँग्रेसचे प्रभारी म्हणाले…

मनोज जरांगे राजकीय नेता नाही, त्यांचा राजकीय पक्ष नाही

वंचितने मविआला दिलेल्या पत्रात मनोज जरांगे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, त्यावर बोलताना राऊत म्हणाले, मनोज जरांगे राजकीय नेता नाही, त्यांचा राजकीय पक्ष नाही, तसेच वंचितचा आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed