• Sat. Sep 21st, 2024
बैठकीचा दिवस बदलला तर हजर राहू, प्रकाश आंबेडकरांचा मविआ नेत्यांना ‘मेसेज’

मुंबई : मविआची बैठक मंगळवारी २७ फेब्रुवारीला असून आपल्या पक्षाची जाहिर सभाही त्याच दिवशी पुण्यात असल्याने ही बैठक एक दिवस पुढे ढकलावी, अशी विनंती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

बैठक एक दिवस पुढे ढकलली तर आपण त्यात नक्की सहभागी होऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीतील पक्ष बैठकीसाठी आमंत्रण पाठवत नाहीत, अशी नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर सोमवारी बैठकीचे अधिकृत आमंत्रण मविआ नेत्यांकडून देण्यात आले.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मविआने वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत असल्याचे जाहिर केले. मात्र, तेव्हापासून मविआतले घटक पक्ष आपल्याला सन्मान देत नसल्याचा आरोप वंचितर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीविषयी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

मात्र, २७ तारखेला पुण्यात वंचितच्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणे शक्य नसल्याची माहिती त्यांनी एक्सवरून दिली. तसेच, बैठकीचा दिवस २७ ऐवजी २८ असेल तर आम्ही येऊ, असेही त्यांनी पाटील यांना कळवल्याचे स्पष्ट केले. यावर पाटील यांनी याविषयी आघाडीतील इतर नेत्यांशी लोकांशी चर्चा करुन सांगतो असे कळविल्याचे आंबेडकर म्हणाले.
मविआचं जागावाटप कधी? किती जागा कुणाला? महत्वाची माहिती समोर, काँग्रेसचे प्रभारी म्हणाले…

प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट

राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा काल फोन आला आणि त्यांनी 27 फेब्रुवारीच्या बैठकीची माहिती दिली. आम्ही त्यांना सांगितले की, २७ तारखेला आम्ही येऊ शकत नाही. पुण्याला वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे. महाराष्ट्राची पूर्ण राज्य कमिटी यावेळी पुण्यात असणार आहे. तसेच, जयंत पाटील यांना विनंती केली आहे की, २८ तारखेला शक्य होत असेल तर आपण तेव्हा बैठक ठरवू.

महाविकास आघाडीच्या बैठकीला न जाण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय, व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं कारण

आंबेडकर म्हणाले की, जयंत पाटील यांनी याविषयी पक्षातील लोकांशी चर्चा करुन सांगतो म्हटले आहे. मात्र, सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये २७ फेब्रुवारीला बैठक असल्याचे सांगितले आहे. पण, आम्ही संजय राऊत यांना सांगतोय, की पुण्यात जाहीर सभा संध्याकाळी असणार आहे. त्यामुळे २७ च्या बैठकीला आमचे जमणार नाही, पण तीच तारीख २८ होणार असेल तर आम्ही येऊ, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed