• Mon. Nov 25th, 2024
    शेअर बाजारात गुंतवणूक करताय? सावधान, नागपूरात सव्वा कोटींना गंडवलं, वेळीच सावध व्हा

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना तब्बल एक कोटी २१ लाखांनी गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी ठकबाजाविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

    काय आहे प्रकरण?

    सूरज मधुकर सावरकर (वय २९, रा. सेलू, जि. वर्धा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठकबाजाचे नाव आहे. विक्रम लक्ष्मण बजाज (वय ४४, रा. नवीन नंदनवन) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. जून २०२२मध्ये विक्रम यांची मित्राच्या माध्यमातून सूरजसोबत ओळख झाली. ‘मी आयएक्स ग्लोबल कंपनीत ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टो करन्सी व शेअर बाजाराचे प्रशिक्षण देतो’, असे त्याने सांगितले. अमेरिकेच्या या कंपनीद्वारे गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर पाच ते १५ टक्क्यांपर्यंत नफा दिला जातो, असे त्याने विक्रम यांना सांगितले. विक्रम यांनी पाच लाख रुपये ऑनलाइन त्याच्या खात्यात वळते केले. सुरुवातीला सूरजने विक्रम यांना ८ टक्के दराने दोन लाख ६० हजार रुपये नफा मिळवून देत विक्रम यांचा विश्वास संपादन केला. नफा मिळत असल्याने सूरज व त्यांच्या मित्रांनीही एकूण एक कोटी २१ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
    म्हाडाचं घर हवंय? पण अशी चूक नकोच, धारावीत दीड कोटींची फसवणूक, काय घडलं?
    मात्र, सूरजने त्यांना नफा दिला नाही व मूळ रक्कमही परत दिली नाही. फसवणूक झाल्याने विक्रम यांनी पोलिसांत तक्रार केली. नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरजचा शोध सुरू केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *