• Sat. Sep 21st, 2024

एमसीए शोधणार गुणवान क्रिकेट खेळाडू, राज्यात ९ मार्चपासून स्पर्धेचे आयोजन, आजच सहभाग नोंदवा

एमसीए शोधणार गुणवान क्रिकेट खेळाडू, राज्यात ९ मार्चपासून स्पर्धेचे आयोजन, आजच सहभाग नोंदवा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : भारतातल्या गल्लीबोळात क्रिकेट हा खेळ रुजलेला आहे. अनेक चांगले खेळाडू प्रतिकूलतेमुळे गुणवत्ता असूनही कारकीर्द घडवू शकत नाही. अशाच हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आश्वासक पाऊल टाकत ‘महास्पीड स्टार : शोध महावेगाचा’ ही महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांची शोधमोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून वेगवान गोलंदाज निवडले जावेत, यासाठी राज्यात पाच ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. याचा शुभारंभ ९ मार्च रोजी नाशिक येथे होणार आहे. तर समारोप ३१ मार्च रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियम इथे होणार आहे. या स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग विनामूल्य ठेवण्यात आला आहे. केवळ मुलेच नाही, तर क्रिकेट संघटनेने मुलींसाठीसुद्धा हे व्यासपीठ खुले केले आहे. या स्पर्धेत मुले आणि मुली या दोघांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गटांत चुरशीचा थरार रंगणार आहे.

…अशी करा नोंदणी

या मोहिमेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वेबसाइटवर (फॉर्मद्वारे) रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक
संघटनेच्या इतर समाज माध्यमांवरही याविषयीची विस्तृत माहिती उपलब्ध असून, खेळाडूंनी फॉर्म भरून रजिस्ट्रेशन
स्पर्धेचे ठिकाण व अधिक तपशीलवार माहितीसाठी एमसीएची वेबसाइट व सोशल मीडिया हॅण्डल्स पहा

स्पर्धेचे वेळापत्रक…
या ठिकाणी वेगवान गोलंदाजांची शोधमोहीम
९ आणि १० मार्च : नाशिक (उत्तर विभाग) आणि छत्रपती संभाजीनगर (मध्य विभाग)
१६ आणि १७ मार्च : नांदेड (पूर्व विभाग) आणि सोलापूर (दक्षिण विभाग)
२३ आणि २४ फेब्रुवारी : पुणे (पश्चिम विभाग)
या पाच विभागातून निवडलेल्या गोलंदाजांची महाअंतिम फेरी : ३१ मार्च, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे गहुंजे स्टेडियम, पुणे
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे, आजपासून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरु
संधीची दालने खुली होतील

या उपक्रमातील वरिष्ठ व कनिष्ठ या दोन्ही गटांतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके मिळणार आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंना महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि महिलांची महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये यायची संधी मिळेल. गुणी खेळाडूंसाठी आगामी काळात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे वर्षभर विशेष प्रशिक्षण शिबिर विनामूल्य राबवले जाईल. विनामूल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून या खेळाडूंना घडवण्याची जबाबदारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना उचलणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव शुभेंद्र भांडारकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed