• Sat. Sep 12th, 2026
तरुणाची पुलावरुन रेल्वे रुळावर उडी, RPF जवान धावत गेला अन्… VIDEO पाहून धडकी भरेल

मुंबई: मुंबई जवळील भाईंदर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने अचानक रेल्वे रुळावरील पुलावरुन थेट रेल्वे रुळावर उडी घेतली. या धडकी भरवणाऱ्या घटनेदरम्यान रेल्वे सुरक्षा दल आणि इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्या तरुणाला रेल्वे रुळावरुन बाजुला केलं आणि त्याचा जीव वाचवला. वरुन उडी घेतल्याने हा तरुण जखमी झाला होता, त्याला सध्या रुग्णालयता दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणाची माहिती तरुणाच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे.

मुंबईच्या भाईंदर रेल्वे स्थानकावरील फुट ओव्हर पुलावरील आहे. येथे हा तरुण या पुलावर चढला, त्यानंतर त्याने थेट रेल्वे रुळावर उडी घेतली. ट्रॅकवर पडताच तो वेदनेने विव्हळत होता. तेव्हा समोर रेल्वे सुरक्षा दलाचे काही अधिकारी आणि काही यात्री उपस्थित होते.

तरुणाला रेल्वे रुळावर पाहून जवानांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्याला उचलून बाजुला केले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. भाईंदर पूर्व-पश्चिमला जोडणारा एफओबीवरुन उडी घेतलेल्या या तरुणाचा व्हिडिओही समोर आला आहे. पश्चिम रेल्वेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच, रेल्वेचे सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला आहे.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा तरुण रेल्वे रुळावर पडला तेव्हा तात्काळ आरपीएफ आणि काही लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्याला बाजुला केले त्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचं कारण सध्या कळू शकलेलं नाही.

मन हेलावणारी घटना! खिचडी ठरली प्राणघातक, चिमुकल्या सख्ख्या बहीण-भावाचा करुण अंत; आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले
Samruddhi Mahamarg : 150 सीसीटीव्ही अन् गोपनीय माहितीदारांचे जाळे, पोलिसांना कडक सॅल्यूट! सिनेस्टाईल दरोडेखोरांच्या नांग्या ठेचल्या
धुळे जिल्ह्यातील ३,५९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ; आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा -पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed