Chhatrapati Sambhajinagar Brother and Sister Die due to Poisoning : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे खिचडी खाल्ल्यानंतर जुलाब व उलट्यांचा त्रास झाल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या दोन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आयुष नारायण थोटे याचा गुरुवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर उपचार सुरू असलेली गायत्री नारायण थोटे हिचाही काल शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
खिचडी खाल्ल्याने मृत्यू दोन लहान भाऊ-बहिणीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : घरची बनवलेली खिचडी खाल्ल्यानंतर अन्नातून तीव्र विषबाधा होऊन दोन चिमुकल्या सख्ख्या बहीण-भावाचा करुण अंत झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा आणि त्याच्या सहा वर्षांच्या सख्ख्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. अवघ्या 24 तासात दोन निष्पाप बालकांची प्राणज्योत मालवल्यानं संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून, आई-वडिलांचा आक्रोश उपस्थितांचं हृदय पिळवटून टाकणारा होता.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली लिंबाजी येथील रहिवासी नारायण साहेबराव थोटे (वय 35), त्यांची पत्नी देवशाला (वय 30), मुलगी गायत्री थोटे (वय 6 वर्षे) आणि मुलगा आयुष थोटे (वय 2 वर्षे) या चौघांनी रात्री घरी बनवलेली खिचडी खाल्ली होती. मात्र, पहाटेपासूनच घरातील चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्यानं दोन्ही चिमुकल्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे कूच करण्याची तारीख जाहीर; राज्यभरातील मराठा बांधवांना महत्त्वाचं आवाहन
रात्रभर मृत्यूशी झुंज अपुरी
गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी पहाटे दोन वर्षांच्या आयुषला उपचारासाठी सिल्लोडकडे नेलं जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. तर, अत्यंत गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहा वर्षांच्या गायत्रीची गुरुवारी रात्रभर मृत्यूशी झुंज अपुरी पडली आणि काल शुक्रवारी सकाळी 9 वाजता तिनेही अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून आई सावरत नाही तोच मुलीचाही मृत्यू झाल्यानं हा दुहेरी डोंगर कसा सहन होणार, या भीतीनं नातेवाईकांनी गायत्रीच्या मृत्यूची बातमी आई देवशाला यांच्यापासून तब्बल 10 तास लपवून ठेवली होती.
Prathamesh Deshmukh : ‘त्याला चहाचंही व्यसन नाही, पोलीस अधिकारी बदला’; प्रथमेश देशमुख प्रकरणात कुटुंबीयांचा संताप, पुणे पोलिसांचा दावा फेटाळला
अवघ्या पाच मिनिटे आधी आईला सांगितलं
सायंकाळी अंत्यसंस्कारासाठी गायत्रीचं पार्थिव गावात आणण्यापूर्वी अवघ्या पाच मिनिटे आधी आईला ही माहिती देण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पिशोर पोलीस ठाण्याच्या पथकानं थोटे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. अधिकारी एम. एल. सिद्दिकी यांच्या पथकाने घरातील खिचडी, अन्नधान्य आणि इतर साहित्याचे नमुने तात्काळ जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या रासायनिक विश्लेषणाचा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा