मुंबई : मराठा आरक्षणाचे लढणारे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सनसनाटी आरोप केल्यानंतर भारतीय जनता पक्षातले नेते संतप्त झाले आहेत. अंतरवाली सराटीहून सागर बंगल्याच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी पलटवार केला आहे. तुम्ही सागर बंगल्यावर येणार आणि आम्ही काय गप्प बसणार काय? सागर बंगल्याआधी आमची एक भिंत आहे, आधी ती भिंत पार करा, असं आव्हानच आमदार नितेश राणे यांनी दिलं आहे तर जरांगेंच्या स्क्रिप्टचा बोलविता धनी कोण आहे? असा सवाल आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. मला सलाइनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. माझा एन्काऊंटर व्हावा, हे फडणवीसांचं स्वप्न आहे. त्यांना एवढीच खुमखुमी आहे ना तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं. परंतु मी समाजाशी असलेली इमानदारी सोडू शकणार नाही, असं जरांगे म्हणाले. त्याचवेळी ते मंचावरून ताडकन उठून मुंबईच्या दिशेने चालत निघाले आहेत. गावकऱ्यांना त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी गावकऱ्यांचं ऐकलं नाही.
Manoj Jarange: ही चाल फडणवीसांची, देवेंद्र फडणवीस तुम्हाला आयुष्यातून उठवेन, मनोज जरांगे आक्रमकजरांगे सागर बंगल्यावर येणार, मग आम्ही काय गप्प बसणार काय? आम्ही पण मराठे आहोत
या सगळ्या घटनेनंतर भाजप आमदारांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, मनोज जरांगे यांना मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत की केवळ फडणवीसांवर आरोप करायचे आहेत? ज्या फडणवीसांनी दोनदा मराठा समाजाला आरक्षण दिलं, तेच आरोपीच्या पिंजऱ्यात का? आताही समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचं काम फडणवीसांनी केलं, यापुढची लढाई न्यायालयीन असणार आहे. त्यात फडणवीस हे समाजाचा मोठा आधार असणार आहे. जरांगेंना स्क्रिप्ट कोण देतंय हे पाहायला पाहिजे.
मीच येतो फडणवीसांच्या सागर बंगल्यावर.. ताडकन उठून जरांगे मुंबईकडे निघाले
जरांगे सागर बंगल्यावर येणार, मग आम्ही काय गप्प बसणार काय? आम्ही पण मराठे आहोत. त्यांना सागर बंगल्यावर जायच्या आधी आमची भिंत ओलांडून जावं लागेल. फडणवीसांवरील टीका सहन करणार नाही. फक्त मुंबईच्या दिशेने येऊ द्या, मग आम्ही काय करायचं ते पाहू, असंही नितेश राणे म्हणाले.
मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, देवेंद्र फडणवीस यांची मनोज जरांगेंच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया
नौटंकी बस्स करा, बोलविता धनी कोण सांगा, जालन्यातील भैय्या (राजेश टोपे) आहेत काय?
मनोज जरांगे यांनी आता नौटंकी बस्स करा. बोलविता धनी कोण सांगा, जालन्यातील भैय्या (राजेश टोपे) आहेत काय? फडणवीसांचे नाव घेऊ नका. लेकरू म्हणून ढेकर देण्याचं काम करू नका. सरकारने आरक्षण दिलंय. तुमच्या आंदोलनामागे राजकीय अजेंडा असल्याचा डाव लोकांच्या लक्षात आलाय, असं प्रसाद लाड म्हणाले.