बुलढाणा: येथील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे जबाब नोंदवला आहे..शिवाय आमदार यांच्या गळ्यातील तो वाघ दात सदृश्य वस्तू सुद्धा वन विभागाच्या पथकाने जप्त केला.या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे..वाघाच्या दातासारखी वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली असून डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांनी दिली..बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी १९ फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून, १९८७ मध्ये त्याची शिकार केल्याचे वक्तव्य केले होते..तो व्हिडिओ सध्या व्हायरल ही होत आहे. यासंदर्भाने प्रादेशिक वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांचा जबाब घेतल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
आता यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे बुलढाणा प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी अभिजीत ठाकरे यांनी सांगितले. तर हा दात खरंच वाघाचा असेल तर अशा प्रकरणांमध्ये तीन वर्षांची शिक्षा सुद्धा सुनावली जाते.

संजय गायकवाड त्यांच्या वक्तव्यामुळं वादात
शिवसेना आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्यामुळं वादात सापडत असतात. ठाकरेंचं सरकार असो की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकार असो या कालावधीमध्ये संजय गायकवाड त्यांच्या वक्तव्यामुळं चर्चेत राहिल्याचं अनेकदा समोर आलं आहे. मध्यंतरी संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबतच्या वक्तव्यानं चर्चेत आले होते.