• Sat. Sep 21st, 2024

किरण सामंत नारायण राणेंच्या भेटीला, आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, चर्चांना उधाण

किरण सामंत नारायण राणेंच्या भेटीला, आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, चर्चांना उधाण

रत्नागिरी: कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हे उमेदवारीसाठी चर्चेत राहिले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत असताना आता पुन्हा एकदा उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांचे नाव चर्चेत आले आहे. किरण सावंत हे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. नारायण नाणे यांनी किरण सामंत यांना आशीर्वाद दिल्याने पुन्हा एकदा महायुतीकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आलं आहे.
शरद पवारांना तुतारी चिन्ह मिळालं, त्यांनी तुतारी वाजवत स्मशानाकडे निघावं, सदाभाऊंची जीभ घसरली
याचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये किरण सामंत हे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी किरण सामंत फायनल होणार का? अशी चर्चा यामुळे रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे लवकरच पडघम वाजू लागतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवणारच या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. कारण यावेळी किंगमेकरची भूमिका बाजूला ठेवून किरण सामंत हे लोकसभेसाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी नियोजन बद्ध प्रचार ही सुरु केला आहे. १ मार्चपर्यंत या मतदारसंघाचा उमेदवार कोण हे जाहीर होईल.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर अजित पवारांच्या उमेदवाराचं पण काम करणार | शिवाजीराव आढळराव पाटील

भाजपकडून नारायण राणे यांनी अगोदरच आपण इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. तर मंत्री रवींद्र चव्हाण पालघर, ठाण्याची जबाबदारी सोडून इथे येऊ शकत नाहीत. त्यामुळे आता पुन्हा एकदा महायुतीकडून किरण सावंत यांचा पर्याय समोर आला आहे. आता भाजपमध्ये इच्छुकच्या यादीत माजी आमदार बाळ माने आणि माजी आमदार प्रमोद जठार यांची नाव आहेत. पण ही दोन्ही नावे मतदारसंघात कितपत चालतील याबाबत साशंकता आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेकडून किरण सामंत हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. दरम्यान नारायण राणे यांची नुकतीच किरण सामंत यांनी भेट घेऊन पाया पडून आशीर्वाद घेतले आहेत. राणे कुटुंबीय यांनीही किरण सामंतांना आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे आता किरण सामंतांचा मार्ग सुखकर झाल्याचा बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed