• Sat. Sep 21st, 2024

हातकणंगलेचा खासदार बहुजनांचा होईल, धैर्यशील तुम्हाला यंदा थांबता आलं तर थांबा : सदाभाऊ खोत

हातकणंगलेचा खासदार बहुजनांचा होईल, धैर्यशील तुम्हाला यंदा थांबता आलं तर थांबा : सदाभाऊ खोत

सांगली: लोकसभा मतदारसंघामधील इस्लामपूरमध्ये महायुतीचा रयत क्रांती संघटना पुरस्कृत शेतकरी कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये बोलताना रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा बहुजनांचा होईल. तसेच मला देखील खासदार व्हायचं होतं. त्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मी रान तयार केलं. त्याची पेरणी देखील केली. परंतु ही जागा शिवसेनेकडे देण्यात आली, असं म्हणाले आहेत.
मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांवर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न
सदाभाऊ खोत म्हणाले की, वळवाचा पाऊस पडल्यासारखं धैर्यशील माने आले आणि ते खासदार झाले. मला देखील खासदार व्हायचं आहे. त्यामुळे धैर्यशील माने तुम्ही आता थांबता का बघा. आपल्या दोघात आता पहिला फिरण्याची वेळ आली आहे. मला तिकीट मिळालं तर तुम्ही माझ्या पाठीशी राहा. तुम्हाला तिकडे मिळालं तर मी तुमच्या पाठीशी राहतो. पक्षाकडून आम्हाला शेत नांगराला लावलं जातं. खुरपायला लावलं जातं. पण ऐनवेळी पीक मात्र दुसराच घेऊन जातो. आम्हाला मात्र बांधावरच बसावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आता मला देखील खासदार व्हायचं आहे.मला देखील दिल्लीत जाऊन पाहू दे तिथे काय आहे. त्यामुळे इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी जाहीरपणे लोकसभेची उमेदवारी मागितली. यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्येच आता अलबेल असल्याचं तसेच लोकसभेचे उमेदवार मिळण्यासाठी चढावर असल्याचे दिसून येते. तसेच लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बहुजनांचा असल्याने त्यांनी ठणकावून सांगितलं.

कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनाचा निवडणुकांवर धोकादायक परिणाम होणार नाही | पंकजा मुंडे

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, तसेच शरद पवार यांना आता तुतारी मिळाली आहे. तुतारीचा उपयोग फक्त दोन वेळा केला जातो. लक्ष्मीच्या पावलाने नवरी घरी येताना, नवऱ्याला हळद लागल्यावर आणि स्मशानात जाताना. शरद पवारांना आता तुतारी मिळाली आहे, त्यामुळे त्यांनी तुतारी वाजवत स्मशानाकडे जावं, असं धक्कादायक विधान सदाभाऊ खोत यांनी यावेळी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed