• Sat. Sep 21st, 2024
रन आऊट झालेल्यांना बॉलिंग का करायची ;डॉ. अमोल कोल्हे यांचे आढळरावांना सनसनीत उत्तर

पुणे : रन आऊट झालेल्या बॉलिंग का करायची, ज्या माणसाला पद दिले, पण बोळवण करू नका, अशी सांगण्याची वेळ येते. जिथे काम बोलायला पाहिजे होत तिथे रन आऊट झालेल्या ला बॉलिंग टाकण्यात काय मजा आहे, अशी जहरी टीका खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केली आहे.

मंचार येथे शरद पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी भाषणादरम्यान अमोल कोल्हे यांनी आढळराव यांच्यावर टीका केली आहे. यावेळी कोल्हे म्हणाले की, आतापर्यंत जेवढे प्रकल्प आणले त्याची मंजुरी कुणी आणली हे तारीख आणि वारसहित वेळ आल्यावर सांगतो. हे पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे बाबत ते सांगतात, त्यांना हे ही माहित नाही की रेल्वे कुठून कुठून जाते. ती रेल्वे कॅबिनेटच्या अंतिम मंजुरीसाठी आहे.

आज जे कुणी म्हणत की, आम्हाला अभिनेता नको नेता हवा आहे. त्यांनी उत्तर द्यावं की, ३३४ वर्षे माझ्या राजाची समाधी दुर्लक्षित होती. १५ वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधित्व करत होतात. का डोळे उघडले नाहीत. अरे मला अभिमान आहे, अभिनेता असल्याचा उग या पक्षातून त्या पक्षात जात बसत. आणि स्वार्थासाठी इकडून तिकडे झाडा माग गाणं म्हणत फिरण्याचा अभिनय केलेला नाही. जो तुम्हाला वैयक्तिक आयुष्यत तिकिटासाठी या गटात जाऊ की त्या गटात जाऊ अशी वेळ माझ्यावर आली नाही. कारण अभिनय केला तो माझ्या धाकल्या धन्याचा केला, छत्रपती संभाजी महाराजांचा केला. त्याचा इतिहास जगातील १५७ देशापर्यंत पोहचवला असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed