सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात हा कलामहोत्सव तुमच्या स्टाइलने ‘शॉर्ट्स’मध्ये टिपा आणि आम्हाला पाठवा. बुधवार २१ फेब्रुवारी ते शुक्रवार २३ फेब्रुवारी दरम्यान संध्याकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरच्या टाइम्स इमारतीच्या प्रांगणात हा साहित्य, कला आणि संस्कृतीचा हा आधुनिक मेळा रंगणार आहे. पहिल्या दोन दिवसात या मेळ्याचा अनुभव घ्या आणि ते सारे अद्भुत क्षण कॅमेऱ्यात ६० सेकंदांच्या ‘शॉर्ट्स’मध्ये टिपून आम्हाला त्वरित पाठवा. तिसऱ्या दिवशी तुमच्यातला सर्वोत्कृष्ट कोण, त्याचा निकाल जाहीर करण्यात येईल. हे शॉर्ट्स व्हर्टिकल स्वरुपात असणे आवश्यक आहे.
६० सेकंदांचा ‘शॉर्ट्स’ बनवा
‘मायमराठी… उत्सव मराठीचा’ महोत्सवातील आगळ्यावेगळ्या उपक्रमांचा अनुभव घ्या आणि तुमच्या अनुभवाचा ६० सेकंदांचा ‘शॉर्ट्स’ आम्हाला [email protected] या ईमेलआयडीवर पाठवा. तुम्ही पाठवलेले शॉर्ट्स ‘मटा’च्या अधिकृत युट्यूब चॅनलवर दाखवले जातील. काय मग… होताय ना या अनोख्या स्पर्धेसाठी तय्यार?