• Mon. Nov 25th, 2024

    Shiv Jayanti 2024: आठ वर्षांची परंपरा कायम, अमेरिकेत यंदाही दणक्यात शिवजयंती साजरी

    Shiv Jayanti 2024: आठ वर्षांची परंपरा कायम, अमेरिकेत यंदाही दणक्यात शिवजयंती साजरी

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज या ११ अक्षरी मंत्राचे गारुड केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरात असलेल्या मराठी मनांवर आहे. म्हणूनच अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डॅलस-फोर्टवर्थ येथील ११००हून अधिक कुटुंबे सभासद असलेल्या डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाने यंदाची शिवजयंतीही दणक्यात साजरी केली.

    यंदाच्या उत्सवाचे खास वैशिष्ट्य होते, शिवचरित्रातून प्रेरणा घेत पुण्यातील ‘लाल महाल’ आणि त्याच्याशी निगडित विविध घटना चितारणारा सुजित साठे यांच्या संकल्पनेतील कार्यक्रम. तब्बल १४०हून अधिक कलाकारांनी दृकश्राव्य माध्यमाच्या मदतीने हे सादरीकरण केले आणि उपस्थित शिवप्रेमींची वाहवा मिळवली. नजरेत भरणारे नेपथ्य व साठे यांच्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या निवेदनाने प्रेक्षकांना स्वराज्यातच पोहोचवले आणि नंतर त्या भारावलेल्या वातावरणातच ढोल-ताशांच्या गजरात सर्वांनी महाराजांची भव्य मिरवणूकही काढली. या औचित्याने मंडळाने रक्तदान शिबिरही घेतले.
    ड्रग्जचा शोध संपता संपेना! नाशिकमध्ये ‘नवे पेडलर्स’ सक्रिय, चोरीछुपे विक्री सुरुच, परराज्यातील कनेक्शन?
    अमेरिकेत वाढणाऱ्या आपल्या मुलांना आपल्या थोर महाराजांची महती कळावी, या उद्देशाने मंडळातर्फे सन २०१५पासून हा शिवजयंती उत्सव होत आहे, असे मंडळाचे अध्यक्ष अनुप श्हापूरकर यांनी सांगितले. मंडळाचे खजिनदार युधिष्ठिर जोशी, सचिव शामली असनारे, सहखजिनदार श्रीरंग गोल्हार यांच्यासह अनेकांना या भव्य उत्सवाच्या आयोजनात अनेक सभासदांनी उत्स्फूर्तपणे मदत केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed