• Sat. Sep 21st, 2024
काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरता, विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा

शिर्डी, अहमदनगर : भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असा टोला विखे पाटलांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना लगावलाय. शिवजयंतीनिमित्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना विखे बोलत होते.

यावेळी विखे मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना म्हणाले की ,मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केलीय. आमची सर्वांची तीच भूमिका आहे मात्र अन्य समाजात आरक्षण देणे शक्य नाही. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मराठा समाज मागासलेला असल्याचे सँपल सर्वेत सिद्ध होतंय. उद्याच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षणाचा ठराव आम्ही आणतोय. सर्व राजकीय पक्ष पाठिंबा देतील आणि ठराव एकमताने मंजूर होईल अशी अपेक्षा विखे पाटलांनी व्यक्त केलीय.

काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात

बाळासाहेब थोरात यांनी लोणावळ्यात काँग्रेसच्या शिबिरात विखेंवर धंदेवाईक राजकारणी म्हणून टीका केली होती. सत्ता असेपर्यंत ते संबंधित पक्षात असतात. सत्ता जाण्याची जशीही चाहूल लागते, तसे ते उडी मारतात, असे टोमणे थोरातांनी विखेंना मारले होते. त्यांच्या याच फटकेबाजीला विखेंनी उत्तर दिलंय. अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असा टोला विखे पाटलांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना लगावलाय.
अमित शाहांसोबतची २५ मिनिटांची चर्चा आणि कांदा निर्यात बंदी उठली, विखे पाटलांनी ‘अंदर की बात’ सांगितली!

शरद पवारांवर टीका

सुप्रिया सुळे यांनी केलेले आरोप बद्दल पत्रकारांनी विचारले असता विखे म्हणाले सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याला मी महत्व देत नाही. त्यांचे वडील अनेक वर्षे केंद्रात कृषीमंत्री होते. शेती मालाच्या भावाला स्थिरता यावी म्हणून त्यांनी काय प्रयत्न केले ते सांगावे. सूचना करणे सोपे आहे. मात्र जेव्हा सत्तेत असताना संधी होती त्यावेळी मात्र शेतकरी दिसला नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
अशोक चव्हाणांच्या नगरमधील खंद्या समर्थकाचाही काँग्रेसचा राजीनामा, भाजपत एन्ट्री करणार?

भारत सरकारने आमची मागणी मान्य केली

कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात भारत सरकारने आमची मागणी मान्य केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील निर्यात बंदी उठविण्यासाठी प्रयत्नशील होते. यापुढे दलालांमार्फत खरेदी पेक्षा शेतकऱ्यांना थेट कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्याचा सरकारचा विचार सुरू असून आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचं विखे पाटलांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed