• Mon. Nov 25th, 2024
    अभिजित बिचुकले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अवतरतात…

    सातारा : आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बिचुकले साक्षात शिवरायांच्या वेशभूषेत अवतरले. साताऱ्यात शिवतीर्थवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बिचुकलेंनी अभिवादन केलं.

    आज छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. दुपारच्या सुमारास साताऱ्यातील शिवतीर्थवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होण्यासाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आले.
    शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावलं, राज ठाकरे भडकले; म्हणतात, निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत होतं का?
    ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत होते. यावेळी बिचुकलेंच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
    काँग्रेस उमेदवारांची चाचपणी, अशोक चव्हाणांच्या गच्छंतीनंतर समितीवर नवा नेता, यादी दिल्लीला

    अभिजित बिचुकले काय म्हणाले?

    “शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून स्वतः कलाकार या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये आलो आहे. संपूर्ण नवीन पिढीला सांगेन की खऱ्या अर्थाने या देशामध्ये सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि त्या धर्तीवर स्वराज्याला अभिप्रेत असलेले संविधान विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांनी लिहिले.” असं अभिजित बिचुकले म्हणत होते.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नवीन संसद भवनाला द्यावं, मोदींनी माझी मागणी मान्य करायलाच हवी | अभिजीत बिचुकले

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    तर आज या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान खऱ्या अर्थाने जिवंत ठेवायचे असेल, तर या दोन्ही महापुरुषांना संपूर्ण नतमस्तक होऊन अनुकरण आपण केले पाहिजे.” अशा भावना यावेळी अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *