मुंबई महानगरपालिकेकडील ४१३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढण्यात येत आहे. एवढे शिक्षक बाहेर काढले तर मुलांना शिकवणार काय? निवडणूक आयोग पाच वर्ष काय काम करतो. पाच वर्ष लोक का तयार करत नाहीत. आयत्यावेळी शिक्षकांवर जबाबदारी टाकली जाते. शिक्षकांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला जातोय पण निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येत नाही. पाच वर्षानं दरवेळी निवडणुका येतात, तुम्हाला यंत्रणा तयार करता येत नाही का?, असा सवालही ठाकरे यांनी केला.
शिक्षक हे निवडणुकीची काम करण्यासाठी आलेत का? शिक्षक हे मुलांना शिकवण्यासाठी आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलं. शिक्षकांनी कुठंही रुजू होऊ नये. निवडणूक आयोगानं नवी लोकं तयार करावीत, त्यांना प्रशिक्षण द्यावं. शिक्षकांवर शिस्तभंगाची कोण कारवाई करतंय ते पाहायचं आहे. निवडणूक आयोगासोबत आमची लोकं बोलतील आणि मग नंतर बोलेन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.कोर्टानं निवडणुकीच्या कामासाठी पाच दिवस परवानगी दिलेली असताना शिक्षक तीन तीन महिने का हवेत, असं राज ठाकरे म्हणाले.
आम्ही निवडणूक आयोगाला विचारु पाच वर्ष काय काम करता? निवडणूक आयोगाचा आयुक्त तिकडे असतो, तो पाच वर्ष काय करतो. निवडणुकीच्या वेळी माणसं घेता मग पाच वर्ष काय करता? ही काही पहिली निवडणूक आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. खरतंर निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे. पाच वर्ष झोपा काढता आणि ऐनवेळी जागे होता, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
Read Latest Maharashtra News And Marathi News
निवडणूक आयोग महाराष्ट्रासाठी आहे, माझ्याकडे मुंबईचं पत्र आलंय पण आयोग राज्यासाठी आहे, त्यामुळं हे सर्व राज्यासाठी आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
एनडीएसोबत जाण्यासंदर्भातील प्रश्नावर राज ठाकरे यांनी निवडणूक आल्यावर बोलू असं म्हटलं. माझा विषय वेगळा आहे, ज्यावेळी निवडणुकीवर बोलायचं त्यावेळी निवडणुकीवर बोलेने, आलायत म्हणून विचारयचं नाही, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.
मराठा आरक्षण हा राज्याचा नाहीच, केंद्राचा विषय आहे, सुप्रीम कोर्टाचा आहे. काही तांत्रिक बाबी आहेत. त्या सोडवल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. आम्ही त्यांना त्यांच्यासमोरच सांगितलं होतं, हा झुलवत ठेवण्याचा विषय आहे, असं राज ठाकरे म्हणाले.