• Sat. Sep 21st, 2024

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचार सुरु असताना रुग्णालयातून धूम ठोकली, बाहेर पडताच…

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचार सुरु असताना रुग्णालयातून धूम ठोकली, बाहेर पडताच…

बुलढाणा: जिल्ह्यातील साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या गोरेगाव येथील एका युवकाने विषारी औषधप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना या युवकाने रुग्णालयातून धूम ठोकली. पळून जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली गंभीर जखमी झालेल्या या युवकाचा १८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. गणेश विनायक पंचाळ असे मृतक युवकाचे नाव आहे.
लेणी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, ७० जणांवर प्राथमिक उपचार
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील गणेश विनायक पंचाळ यांचे पदविपर्यंत शिक्षण झाले होते. शिक्षण झाल्यानंतर वडिलांसोबत शेतात काम करीत होते. चार एकर शेती, दोन भाऊ, आई वडील, भावाची मुले असा परिवार असताना केवळ शेतीच्या तुटपुंज्या उत्पादनावर प्रपंचाचा गाडा कसा चालेल, या विवंचनेत गणेश पांचाळ यांनी १४ फेब्रुवारी रोजी शेतातच विषारी औषध प्राशन केले. ही बाब समोर येताच त्यांना तातडीने त्याला साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

तेथे प्राथमिक उपचार करुन बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याचे अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना १६ ला प्रकृतीत सुधारणा झाली. परंतु जीवनाला कंटाळलेल्या गणेशने उपचार सुरू असताना सलाईन आणि इतर ठिकाणी लावलेल्या नळ्या काढून फेकल्या. रुग्णालयातून धुम ठोकली. पळताना एका अज्ञात वाहनाची धडक त्याला बसली. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मी गेल्यावरही लोकांनी तुझा सन्मान ठेवायला पाहिजे, सतेज पाटलांनी सांगितला विलासरावांसोबतचा किस्सा

अपघातात गणेश पंचाळ यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या अंगावरील रुग्णालयातील कपडे पाहून पोलिसही चकित झाले झाले. नेमका हा काय प्रकार आहे. तरीही पोलिसांनी शासकीय रुग्णालयात नेले. तेथे गेल्यानंतर संपूर्ण हकीकत पोलिसांनी समजली. डॉक्टरांनी पुन्हा उपचार सुरू केले. मात्र ते रुग्णालयात थांबायला तयार नव्हते. अखेर डॉक्टरांनी उपचार करुन कुटुंबाच्या स्वाधीन केले. वडील विनायक पंचाळ त्याला घरी घेऊन आले. काळाने त्याच्यावर झडप घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed