• Sat. Sep 21st, 2024
मनसेतून हकालपट्टी, अमित ठाकरेंवर आरोप करणाऱ्या महेश जाधवांची दादांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष राहिलेल्या महेश जाधव यांनी वाशी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेश जाधव यांचे पक्षात स्वागत केले. आगामी कालावधीत त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी पडण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींने दिले आहेत. महेश जाधव यांच्यासह अनेक असंख्य कामगारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

महेश जाधव यांनी ९ जानेवारी रोजी अमित ठाकरे आणि इतरांवर गंभीर आरोप केले होते. तोंडातून रक्त निघालेल्या अवस्थेत महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत त्यांना मारहाण झाली असल्याचा दावा केला होता. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी महेश जाधव आणि अमित ठाकरे यांच्यातील फोनद्वारे झालेल्या संभाषणाची एक तथाकथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महेश जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
काका पुतण्या नातं काँग्रेसला धार्जिणं, विनोदी पण तितकंच विचार करायला लावणारं जयंतरावांचं भाषण
महेश जाधव राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. यावेळी अजित पवारांनी ‘नमक हराम’ या चित्रपटाचा दाखला देऊन, त्यातही असेच झाले असल्याचे सांगितले. ‘महेश जाधव हा गोदी कामगाराचा सुपूत्र असल्यामुळे कुठल्याही कामगारावर अन्याय होऊ द्यायचा नाही. त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल’, असं सांगत जाधव यांना अधिकृतपणे राष्ट्रवादीत घेतल्याचं जाहीर केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed