• Mon. Nov 25th, 2024
    विमाने वेळेत उतरवण्याचे विमानतळ प्रशासन व हवाई नियंत्रण कक्षाचे कसोशीने प्रयत्न

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विमानतळावरील गर्दीमुळे विमानांना होत असलेल्या विलंबाबाबत नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला नोटीस बजावली. या नोटिशीनुसार विमानतळाला आधीच ४० उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. यानंतर आता विमानांना होणारा विलंब टाळण्यासाठी बाहेरून येणारी विमाने हवेत घिरट्या न घालता वेळेत खाली उतरविण्याचे आव्हान सध्या विमानतळासमोर असून त्यादृष्टीने कसोशीचे प्रयत्न विमानतळ प्रशासन व हवाई नियंत्रण कक्षाने (एटीसी) सुरू केले आहेत.

    मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक व्यग्र तळ आहे. विमानतळावरून दररोज सरासरी ९०० विमानांची ये-जा होते. मात्र जवळपास सर्वच विमाने भरून येत असल्याने प्रवाशांची गर्दी विमानतळावर आहे. परिणामी प्रवाशांच्या बोर्डिंगला विलंब होऊन आगमन होणाऱ्या विमानांना हवेत घिरट्या घालाव्या लागतात. त्यामुळे या विमानांचा ‘ऑन टाइम परफॉर्मन्स’ (ओटीपी) विस्कळीत होतो. हा पाळण्याचेच आव्हान आता विमानतळासमोर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
    हेलिकॉप्टरने फिरू नये असा काय कायदा आहे का? शेतकऱ्यांनो, तुम्हीही हेलिकॉप्टर घ्या : एकनाथ शिंदे
    हवाई नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संबंधित सूत्रांनी याबाबत सांगितले की, ‘विमान वेळेवर पोहोचते अथवा नाही, याबाबतचा ओटीपी हा विमानसेवा कंपनीबाबत गणला जातो. मात्र यासाठी विमानसेवा कंपन्या विमानतळावर अवलंबून असतात. त्यामुळे आता केंद्र सरकारने विमानतळाला अलीकडे बजावलेल्या नोटिशीनंतर एटीसीसमोर प्रामुख्याने या ओटीपीचेच आव्हान आहे. आगमन होणाऱ्या विमानांना घिरट्या घालाव्या न लागता थेट विमानतळावर उतरता यावे, हे सांभाळण्याची जबाबदारी एटीसीवर आहे. मात्र त्यासाठी विमानतळावर विमाने उभे करण्याची जागादेखील मोकळी हवी. एकंदरीत ओटीपी आता अत्यावश्यक असेल.’

    सूत्रांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने नोटीस बजाविण्याआधी मुंबईच्या विमानतळाबाबत विमानसेवा कंपन्यांचा ओटीपी हा ६० टक्के होता. ६० टक्के विमाने वेळेत खाली उतरत होते. गर्दीमुळे तब्बल ४० टक्के विमानांना ४०-४० मिनिटे हवेत घिरट्या घालाव्या लागत असे. नोटिशीनंतर विमानोड्डाणे कमी केल्यानंतर आता हा आकडा ८० टक्क्यांवर आला आहे, हे विशेष.

    एटीसी-टर्मिनलचे समन्वयासाठी जोरकस प्रयत्न

    विमानांना तळापर्यंत आणून खाली उतरविणे व नंतर सुखरुप उड्डाण घडवून आणणे, ही जबाबदारी एटीसीची असते. मात्र यासाठी टर्मिनलजवळील तळावर उभी असलेली विमाने प्रवासी आणि त्यांचे सामान चढवून नियोजित वेळेत हवेत झेपावणेदेखील अत्यावश्यक असते. ही जबाबदारी विमानतळ ऑपरेटरची असते. यामुळेच केंद्र सरकारच्या नोटिशीनंतर आता एटीसी-टर्मिनल व्यवस्थापक यांनी समन्वयासाठी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed