• Sat. Sep 21st, 2024
महाराष्ट्र सर्वधर्म समभाव पाळणारं राज्य – अजित पवार

नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी स्पष्ट भाषेत वक्तव्य केले होते की, अजित पवार नेहमी घातच करतात. ह्या वक्तव्यावर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना सांगितले की, नवीन जनरेशन आहे. काही बोलली असली तरी त्याला उत्तर देण्याचे काही कारण नाही. तसेच सध्या अनेक नवीन तरुण राजकारणात आलेले आहेत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा करू. तसेच बारामतीमध्ये पाटील पवार कलगितुरा पाहायला मिळणार असल्याचे विचारताच अजित पवार म्हणाले की, मला असं वाटत नाही, असे वक्तव्य करत बोलणं टाळलं.
काका पुतण्या नातं काँग्रेसला धार्जिणं, विनोदी पण तितकंच विचार करायला लावणारं जयंतरावांचं भाषणअजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र सर्वधर्म समभाव पाळणारं राज्य आहे. अल्पसंख्याक समाजाने कायम विश्वास दाखवला आहे. मुस्लिम समाजामध्ये भय दाखवून समाजाला अस्वस्थ करू पाहत आहेत. मात्र प्रदेशातील सर्व नागरिकांची जबाबदारी आमची आहे. राज्यात कायद्याचं राज्य असेल आणि कोणावर अन्याय होणार नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीने वाशी इथल्या सिडको प्रदर्शनी केंद्रात राज्यस्तरीय अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या अल्पसंख्याक मेळाव्यात मंजूर झालेल्या ठरावावर बारकाईने लक्ष देणार असल्याचं आश्वासन ही अजित पवार यांनी दिलं. आमच्या पक्षात जास्तीत जास्त जिल्ह्यात अध्यक्ष अल्पसंख्याक समाजातील आहेत. हा महत्वाचा विभाग आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. या समाजातील मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. वफ्फ बोर्डाच्या अडचणी सोडविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. मागील वर्षी ५०० करोड दिले आहेत. या वर्षी जास्तीत जास्त मदत देण्यात प्रयत्न केला जाणार आहे. उर्दू हाऊस देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले.

मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण; दुसरीकडे उपोषणस्थळी आलेल्या हजारो बांधवांसाठी भाजी-भाकरीची सोय

ते पुढे म्हणाले की, जे बोलतो ते करतो. सर्वांना सोबत घेऊन चाललो आहोत. राज्यात कायद्याचं राज्य असेल आणि कोणावर अन्याय होणार नाही, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. ८ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. या योजनेमध्ये अल्पसंख्याक समाजातील मुलींचाही समावेश असणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed