• Mon. Nov 25th, 2024

    निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाची जय्यत तयारी; आदित्य ठाकरे येणार एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्यात

    निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाची जय्यत तयारी; आदित्य ठाकरे येणार एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्यात

    ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभेवर ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लक्ष केंद्रित केले असून उद्या, रविवारी सायंकाळी ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ठाण्यातील शाखांना भेटी देऊन पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत. या निमित्ताने ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.
    एकनाथ शिंदे यांचं चालणं बोलणं वागणं ठाकरे गट रोखू शकत नाही, भरत गोगावले यांचं वक्तव्य
    ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील पालिकांवर आजवर शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. शिवसेनेतील उठावानंतर जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठे समर्थन मिळाले असून सद्यस्थितीत मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो, असे असले तरीही उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात आहॆ. दरम्यान शिवसेनेतील उठावानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक होणार असून त्यासाठी शिंदे गटाकडून ठाणे आणि कल्याण लोकसभेत जोरदार तयारी सुरू आहे. तर ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे हे ठाकरे गटात आहेत.

    भावनिक राजकारण तर विरोधी लोकच करत आहेत, शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं

    ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी ठाकरे गटाकडून व्युहरचना आखली जात असून ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरावर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सायंकाळी ५ वाजता ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत. ठाण्यातील आनंदनगर, मनोरमानगर, चंदनवाडी आणि जिजामातानगर या शाखांना आदित्य ठाकरे भेटी देणार असून तेथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या निमित्ताने ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. मागच्या आठवड्यात कल्याणमध्ये आदित्य ठाकरे येऊन गेले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेवर नाव घेता जोरदार टीका केली. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे काय बोलतात हे पहावे लागेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *