• Sat. Sep 21st, 2024
व्यावसायिक व्हिसावर पुण्यात आली; भाड्यानं रुम घेतली, मात्र भलतचं सत्य समोर, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील एका सदनिकेत सुरू असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला. यावेळी पोलिसांनी थायलंडमधील दोन तरुणींना ताब्यात घेतले असून, तरुणींना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी थायलंडमधील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेली महिला व्यावसायिक व्हिसावर भारतात आली असून, वेश्याव्यवसायासाठी तिने सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील बेकायदा धंदे समूळ नष्ट करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. दरम्यान, कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रस्त्यावरील एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक अश्विनी सातपुते, गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनखाली तपास पथकाने सदनिकेत छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस हवालदार रईसा बेग यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. थायलंडच्या महिलेविरोधात अनैतिक मानवी देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूणमध्ये राणे-ठाकरे समर्थकांमध्ये मोठा राडा, निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक
नोकरीसाठी तरुणी भारतात
वेश्याव्यवसाय करणाऱ्या थायलंडमधील दोन्ही तरुणींना आरोपी महिलेने स्पामध्ये काम देण्याच्या आमिषाने भारतात आणले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था आरोपी महिलेने कोरेगाव पार्कमधील सदनिकेत केली होती. ही सदनिका महिलेने भाड्याने घेतली होती, अशी माहिती गुन्हे निरीक्षक चेतन मोरे यांनी दिली.

आरोपी महिला व्यावसायासाठी भारतात आली आहे. तिच्या व्हिसाची मुदत जून २०२४ पर्यंत आहे. महिलेचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
– चेतन मोरे (निरीक्षक (गुन्हे), कोरेगाव पार्क पोलिस ठाणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed