• Mon. Nov 25th, 2024

    अजित पवारांच्या आश्वसनानंतरही निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता नाही, ‘मार्ड’चा पुन्हा संपाचा इशारा

    अजित पवारांच्या आश्वसनानंतरही निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता नाही, ‘मार्ड’चा पुन्हा संपाचा इशारा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ, वसतिगृहांची सुविधा आदी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन आठ दिवस उलटल्यानंतरही या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. येत्या दोन दिवसांत त्याबाबत विचार झाला नाही, तर पुन्हा संप करण्याचा इशारा निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने दिला आहे.

    डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेने विद्यावेतनात वाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी ७ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यावेळी या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. वैद्यकीय शिक्षण विभाग, वित्त विभाग व ‘मार्ड’च्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतनवाढ देण्याचे अजित पवार यांनी मान्य केले होते.

    नियमित विद्यावेतन देण्याबाबत वित्त विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. प्रलंबित वसतिगृह मंजुरीचे प्रस्ताव मंजूर करू, असेही सांगितले होते. त्यामुळे ‘मार्ड’ने संप मागे घेतला. मात्र सात दिवस उलटल्यानंतरही, या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी दिला आहे.

    म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed