• Sat. Sep 21st, 2024
मविआचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; शरद पवारांची २४ फेब्रुवारीला पुण्यात सभा

पुणे: देशात लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने आता जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यात आता जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे देखील महाविकास आघाडीचे ठरलं आहे.
कॉंग्रेस सोडून अशोक चव्हाणांच्या हाती कमळ; देशमुख बंधू काय निर्णय घेणार? चर्चांना उधाण
आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात रणनीतीवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट महाराष्ट्रातील कोणत्या लोकसभा मतदारसंघावर दावा करू शकतो या संदर्भात आज सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये साधारणपणे १२ ते १३ जागा शरद पवार गटाला मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मजबूत पक्ष मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर देखील शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपली ताकद अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, शिरूर, माढा, सातारा या जागा लढवणार असल्याचं जवळपास आता निश्चित झालं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सकाळपासून माध्यमांमध्ये सुरू होती.

राहुल गांधींनी संपर्क केला का? पत्रकारांचा सवाल, अशोक चव्हाण काय म्हणाले?

मात्र या चर्चा निरर्थक असल्याचं शरद पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आता शरद पवार हे पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात इतका जोमाने उतरणार असल्याचे चित्र आहे. आता शरद पवार हे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असून महायुतीच्या विरोधात जोरदार सभा घेणार आहेत. याचीच सुरुवात पुण्यातून होणार असून येत्या २४ तारखेला शरद पवार पुण्यामध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed