• Mon. Nov 25th, 2024

    राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून १० जण शर्यतीत; मलिक, सिद्दीकी, तटकरे स्पर्धेत

    राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून १० जण शर्यतीत; मलिक, सिद्दीकी, तटकरे स्पर्धेत

    मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी आहे. मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी कोणीही उमेदवारांची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत. अजित पवार यांच्या गाठीशी असलेल्या आमदारांच्या बळावर त्यांचा एक उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकणार आहे. मात्र अजितदादा आपल्या पक्षातून कोणाला तिकीट देणार याची उत्सुकता वाढली आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, खुद्द अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार, बाबा सिद्दीकी, नवाब मलिक राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.

    उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी निवासस्थानी राज्यसभा निवडणुकांबाबत महत्त्वाची बैठक काल रात्री पार पडली. उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी आज पुन्हा बैठक होणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमधून दहा जणांची नावं चर्चेत आहेत. या नावांवर खलबतं होऊन एक नाव अंतिम केले जाणार आहे.
    मेधा कुलकर्णी यांचं अखेर राजकीय पुनर्वसन? ‘दादां’च्या उमेदवारीमुळे वंचित ‘ताईं’ना राज्यसभा मिळण्याची चर्चा
    राज्यसभेवर ओबीसी समाजाला संधी देण्याची मागणी एका वर्गाकडून केली जात आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यांच्याकडे सध्या राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळांनी बळ दिल्यास मुंबईत पक्षाची ताकद वाढू शकते.
    राज्यसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजप चौथा उमेदवार देण्याची शक्यता, काँग्रेसच्या अडचणीत वाढ?
    दुसऱ्या वर्गाकडून अल्पसंख्याक घटकांना राज्यसभेवर नेतृत्व मिळावं, असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी, नवाब मलिक यांची नावं चर्चेत आहेत. परंतु आधीच अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने टीकेचा धनी झालेला भाजप नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करुन घेण्यास तितकासा इच्छुक नाही. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवाडी यांचंही नाव पुढे केले जात आहे.

    सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री काय…बाबांनो जरा कळ सोसा : अजित पवार

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    दुसरीकडे आनंद परांजपे, अविनाश आदिक यांची नावंही शर्यतीत असल्याचं बोललं जातं. खुद्द अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनाही उमेदवारी देण्याची मागणी काही जणांकडून केली जात आहे. परंतु पार्थ पवार यांना जर संधी मिळाली, तर पुन्हा एकाच कुटुंबात किती पदं दिली जाणार, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याशिवाय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याही उमेदवारीची चर्चा आहे. परंतु तटकरेंना लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवलं, तर महायुतीत रायगडच्या जागेवरील दावा सुटण्याची शक्यता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *