• Fri. Jun 19th, 2026

    पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते समडोळी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

    ByMH LIVE NEWS

    Feb 12, 2024
    पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते समडोळी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

    सांगली दि. १२ (जिमाका) : मिरज तालुक्यातील समडोळी येथ‍े विविध रस्ते व नाल्यांच्या कामांचे भूमिपूजन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. आवश्यकता पडेल तेथे निधी देऊन व विकासकामे करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी दिली.

    समडोळी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पंचायत समिती मिरज शाखा अभियंता प्रमोद शेंडगे, चंद्रकांत पाटील, दिपक मगदूम, संजय बेले, धैर्यशील मोरे, निवास पाटील, मधुकर हुबाले, संदीप सावंत, काकासाहेब धामणे आदि उपस्थित होते.

    समडोळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी प्रस्ताव द्या, निश्चितपणे या कामासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी दिली.

    यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, इस्लामपूर चे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, निवास पाटील, संजय बेले यांनी मनोगत व्यक्त केले.

    स्वागत व प्रास्ताविक दिपक मगदूम यांनी केले. सूत्रसंचालन संदीप कुडचीकर यांनी केले. आभार राजकुमार पाटील यांनी मानले.

    कार्यक्रमास समडोळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed