• Mon. Nov 25th, 2024

    काय करावं शेतकऱ्यानं? हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, आंब्याचा मोहर गळाला, नांदेडमध्ये गारपीट

    काय करावं शेतकऱ्यानं? हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, आंब्याचा मोहर गळाला, नांदेडमध्ये गारपीट

    नांदेड: राज्यातील अनेक जिल्ह्यात आज अवकाळी पावसासह गारपीटीने तडाखा दिला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्हात ही रविवारी सायंकाळी गारपीट झाली. जिल्हातील हिमायतनगर तालुक्यात गारपीटीने झोडपले तर भोकर, हदगाव आणि किनवट तालुक्यात पावसाच्या हलक्या सारी बरसल्या. अन्य तालुक्यात ढगाळ वातावरण होते. गारपीटीमुळे हिमायतनगरमध्ये शेती पिकाचं नुकसान झाल्याची माहिती आहे.
    सर्वेक्षण झाले, आता प्रशिक्षण; परीक्षांच्या दिवसात माध्यमिक शिक्षक पुन्हा वेठीला
    या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हिमायतनगर शहर आणि तालुका परिसरात वादळी वाऱ्यासह आज सायंकाळी गारांचा पाऊस झाला. सुपारी पेक्षाही मोठ्या गारा पडल्यामुळे अनेकांची एक धावपळ उडाली होती. तालुक्यातील जवळगाव, विरसनी, कामारी, सरसम यासह अनेक गावात गारपीट झाली. या गारपीटीमुळे हरभरा, गहू, करडई, तूर, यासह अन्य शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आंब्याच्या झाडाला आलेलं मोहर देखील मोठया प्रमाणात गळून पडला आहे.

    या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा निसर्गाच्या संकटात सापडला आहे. गारपीटीनंतर अवकाळी पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात गारा पडल्यामुळे शेतकरी राजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने तात्काळ हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

    ओबीसी नेत्यांनी काढलेल्या पक्षांचं भुजबळांनी नेतृत्व करावं, आम्ही मदत करू; प्रकाश आंबेडकरांची भूमिका

    दरम्यान, नोव्हेंबर २०२३ मध्ये नांदेडसह अर्धापूर, कंधार, लोहा, हदगाव या तालुक्यात मोठा तर नायगाव बिलोली देगलूर या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. आधीच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेले कापूस, तूर, ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा काढणीला आलेल्या गहू,हरभरा, ज्वारी या सोबतच आंबाच्या झाडाचा मोहर गळाल्यामुळे प्रचंड फटका बसला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed