• Sat. Sep 21st, 2024
मुलींच्या शिक्षणाबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय, चंद्रकांत पाटील माहिती देताना म्हणाले…

नाशिक : आज महाराष्ट्रामध्ये एससी आणि एसटी यांना पुर्ण फी माफ आहे. केंद्र सरकार ६०% आणि राज्य सरकार ४०% सवलत देतं. त्याधरतीवर ओबीसी आणि आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अतिमागासवर्गीयांसाठी ६४२ कोर्सेसला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना निम्मे फी सुरु झाली. मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली होती. त्या मुलीने चिठ्ठीत असं लिहिलं की, माझी निम्मे फी सरकार भरतंय त्यासाठी धन्यवाद. पण उरलेली निम्मे फी भरण्यासाठी माझ्या आई-वडिलांकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी आत्महत्या करतेय. आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नाशिक दौऱ्यावर होते, त्यावेळी प्रसारमाध्यामांशी बोलताना त्यांनी सांगितलं.

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे आहे की, आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ओबीसी आणि मागासवर्गीय मुलींची १००% फी माफ करायची, त्यासाठी एक हजार कोटींचा खर्च येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही जातीच्या, पंथाच्या, धर्माच्या मुलीला मेडीकल इंजिनिअरींगच नाही तर डीम युनिव्हर्सिटीसहित फी सरकार भरणार आहे. त्यामुळे मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढेल, असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी यावेळी दर्शवला.

जळगावातील माजी नगरसेवक बाळू मोरे यांचा त्यांच्यावर झालेल्या गोळीबारात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अपुऱ्या माहितीवर बोलणं काही बरोबर नाही. हल्ला झालाय हे मला कळलं, यावर मी काहीच सांगू शकत नाही. दरम्यान, राज्यातल्या घडणाऱ्या घटनांबद्दल सवाल केला असता ते म्हणाले की, राज्यातल्या घडणाऱ्या घटना या चिंताजनकच आहेत. त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी देखील होत तसेच कारवाई देखील होत आणि सरकार याबाबतीत खूप सतर्क आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed