• Sat. Sep 21st, 2024
ससून रुग्णालयातील दहाव्या मजल्यावर आग; अग्निशमन दलामुळे आगीवर नियंत्रण

पुणे: आज ८.१० च्या सुमारास ससून रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच अग्निशमन मुख्यालयातून एक आणि नायडू अग्निशमन केंद्र येथून एक अशी दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
कापसाला कमी भावाची हमी; गुन्हे टाळण्यासाठी व्यापाऱ्यांची पत्र युक्ती, शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ७०० रुपयांचे नुकसान
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. ससून रुग्णालयातील नवीन इमारतीत दहाव्या मजल्यावर आग लागली होती. त्यानंतर जवानांनी वर धाव घेतली. तिथे वार्डमधील शौचालयामागे असणाऱ्या डक्टमध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी तातडीने अग्निरोधक उपकरण वापरुन आग आटोक्यात आणल्याने मोठा धोका टळला होता.

Amol Kolhe : छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात एन्ट्री घेताना NCP पक्षाचा निर्णय आला, अमोल कोल्हेंनी किस्सा सांगितला

दरम्यान रुग्णालयाच्या वार्डमधील रुग्णदेखील सुखरुप आहेत. आग पूर्ण विझली असून धोका दुर झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणाही जखमी वा जिवितहानी झालेली नाही. आगीचे कारण शौचालयात कोणी धुम्रपान केल्याने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अग्निशमन दल जनजागृतीपर घेत असलेले मॉकड्रीलचा मोठ्या स्वरूपात उपयोग होतो हे या घटनेमुळे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed