• Sat. Sep 21st, 2024
राजकारण करुन जसा रामाचा राजपाट काढून घेतला तसाच उद्धव ठाकरेंचा पक्ष काढून घेतला- सुषमा अंधारे

परभणी: आम्ही राम भक्त आहोत, असा भाजपने आव आणण्याचा प्रयत्न केला. पण मुळामध्ये भाजपला राम कळालेलाच नाही. राम एकपत्नी होते. राम एकवचनी होते आणि राम एकबानी होते. रामाचे खरे अनुयायी उद्धव ठाकरेच आहेत. भाजपला खरे राम कळलेच नाहीत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
मोठी बातमी : बारामती लोकसभेतून भाजपची माघार, अजित पवार उमेदवार देणार, बावनकुळेंनी प्लॅन सांगितला!
मातृ तीर्थ ते शिवतीर्थ अभियानांतर्गत सुषमा अंधारे आज परभणीत आल्या होत्या. येथे महिला शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विशाल कदम अतुल सरोदे अंबिका डहाळे हे प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ७०,००० कोटीच्या घोटाळ्याचा आरोप मोदीजी महाराष्ट्रामध्ये येऊन करतात. त्यानंतर ७२ तासात उलटल्यानंतर ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सत्तेत घेऊन बसतात. जे फडणवीस राष्ट्रवादीला सत्तेमध्ये घेणार नाही नाही नाही अशा घोषणा करत होते, तेच फडणवीस राष्ट्रवादीसोबत जाऊन पहाटे दुपारी संध्याकाळी असे शपथविधी घेत आहेत. त्यामुळे यांना एकवचनीपणा देखील कळाला नाही.

Chitra Wagh on Sanjya Rathod : संजय राठोड यांना महायुतीकडून लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात माझा विरोध | चित्रा वाघ

अंधारे म्हणाल्या की, तसेच राम एकपत्नी होते. पण भाजप आणि शिवसेनेकडे पाहिल्यावर असे वाटत नाही की ते आणि त्यांचे प्रमुख पदाधिकारी एकपत्नी आहेत. राहुल शेवाळे, संजय राठोड, हेमंत गोडसे यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर यांना एकवचनी म्हणावेच कसे हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे श्रीरामाचे खरे अनुयायी उद्धव ठाकरे शोभतात. जसे रामाशी राजकारण करून रामाचा राजपाट काढून घेतला. रामाला वनवासाला तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी राजकारण करून राहुल नार्वेकरसारख्या दहा पक्ष फिरून आलेल्यांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांचा पक्ष काढून घेतला. ज्याला निष्ठा माहित नाही ते राहुल नार्वेकर आज सांगत आहे की, शिवसेना यांची राष्ट्रवादी त्यांची असे लोकांना सांगत आहे. या सर्वांनी कपटनीतीने उद्धव ठाकरेंचा राजपाट हिसकावून घेतला. हा राजपाट हिसकावून घेण्यासाठी भाजपने ईडी, सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्थांचा देखील वापर केला. उद्धव ठाकरेंना राजकीय वनवास कसा भोगता येईल, याची तरतूद केली, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed