• Tue. Nov 26th, 2024
    पालघर लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट-भाजपमध्ये चढाओढ, प्रस्ताव वरिष्ठांच्या कोर्टात

    म. टा. वृत्तसेवा, डहाणू : पालघर लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन जागा निवडून देण्याचा निर्धार भरत राजपूत यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर जाहीर सभेतून व्यक्त केला होता. त्यानंतर लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गट लढवणार असल्याचे शिवसेना पक्षाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, तलासरी येथे भाजपच्या तालुकास्तरीय पदाधिकारी निवडणुकीत, भाजपने ही जागा लढवण्याचा ठराव सर्वानुमते संमत केला आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन पक्षांतच या जागेवरून चढाओढ सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

    जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी ही पक्षाने पालघर लोकसभा निवडणूक लढवावी, अशी आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून हा प्रस्ताव वरिष्ठांकडे ठेवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी सांगितले. तलासरीतील भाजपा कार्यालयात तालुक्यातील पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम अलीकडेच झाला. यावेळी तलासरी तालुकाध्यक्षपदी विनोद मेढा यांची तिसऱ्यांदा निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तर शहर अध्यक्ष सुरेंद्र निकुंभ, सरचिटणीस बबला धोडी व सुनील टोकरे यांच्यासह पदाधिकारी निवडण्यात आले.

    वेध लोकसभा निवडणुकीचा : शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच, बविआ किंगमेकर, ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार?

    प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा तलासरी प्रभारी पालघर जिल्हा मार्गदर्शक बाबाजी काठोळे, जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत संखे, डहाणू विधानसभाप्रमुख अमित घोडा, डहाणू विधानसभा विस्तारक नायर, प्रदेश आदिवासी आघाडी उपाध्यक्ष लूईस काकड, जिल्हाचिटणीस जयवंती घोरखना यांच्या उपस्थितीत निवड झालेल्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

    नवीन जॅकेट जुनी झाली तरी मंत्रीपद मिळेना, ठाकरेंनी भरत गोगावलेंच्या जखमेवर मीठ चोळलं

    दरम्यान, पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी तलासरी तालुक्यात पुरेशी विकास कामे केली नसल्याने आगामी खासदारकीचा उमेदवार आयात केलेला नसावा. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असला पाहिजे, असा प्रकारचा कार्यकरणीचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याने राजपूत यांच्या निर्धाराला पक्षाकडून बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे.

    मोठी बातमी : बारामती लोकसभेतून भाजपची माघार, अजित पवार उमेदवार देणार, बावनकुळेंनी प्लॅन सांगितला!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed