• Mon. Nov 25th, 2024
    उद्धव ठाकरेंना मंत्रिपदासाठी मी एक कोटींचा चेक दिला.., दीपक केसरकरांचा मोठा दावा, नितेश राणे म्हणतात…

    सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद देण्यासाठी कोट्यावधी रुपये माझ्याकडे मागण्यात आले होते. परंतु मी “कमिटमेंट” पूर्ण करण्यासाठी कमी पडलो. त्यामुळे मला डावलण्यात आलं. तरीही तब्बल एक कोटी रुपये मी त्यांना चेकच्या माध्यमातून दिले. तशा प्रकारचे माझ्याकडे पुरावे आहेत, असा आरोप आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. दरम्यान, तब्बल दोन महिने मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर वाट बघत होतो. परंतु मला भेट देण्यात आली नाही. कॅबिनेट मंत्री पदासाठी माझे नाव चर्चेत असताना मला राज्यमंत्रीपद देण्यात आले. तरी मी गप्प राहिलो. मग मी गद्दार कसा? मला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल केसरकर यांनी केलाय.

    पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका केली होती. त्या टिकेला मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत येऊन प्रत्युत्तर दिले. माझ्या श्रध्देवर संशय घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली आहे. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे. मला गद्दार म्हणण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही. त्याचे कर्तृत्व काय? मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा आमदारांनाही भेटत नव्हते. मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर वाट बघत होतो. पण मला कधी भेट मिळत नव्हती. मग यांच्याकडे लोक थांबणार कसे? असा सवाल करत मी स्वतःहून शिवसेनेत गेलो नव्हतो. मला भाजपकडून निमंत्रण असताना उध्दव ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले म्हणून शिवसेनेत गेलो, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

    नितेश राणेंकडून केसरकर यांच्या विधानाचं समर्थन

    दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानाचं मी समर्थन करतो. उद्धव ठाकरे पदांसाठी पैसे घेतात, असा आरोप २००४ साली नारायण राणे यांनी रंगशारदा येथे पहिल्यांदा केला होता. रंगशारदामध्ये शिवसेनेची त्यावेळी बैठक झाली होती. विधानसभा, लोकसभा, जिल्हाअध्यक्ष, उद्धव ठाकरे कसे घेतात त्याचं रेटकार्ड जाहीर करून टाकलं होतं. त्याचप्रमाणे केसरकर देखील म्हणतायत की, मी चेक दिला होता, आणि अकाऊंटमध्ये चेक गेलाय. उद्धव ठाकरे विधानसभा, लोकसभेसाठी पैसे घेतात हे शिक्कामोर्तब झालेला आहे.

    वैभव नाईक म्हणाले, राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर दिपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेत निवडून आणून विधानसभेवर पाठवण्यात आले. राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर त्यांना आम्ही निवडून देणार नाही, त्यामुळे केसरकर यांनी शिवसनेत प्रवेश केला. नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांना जिल्हा नियोजन मधून बाहेर ठेवलं होतं. त्यामूळे शिवसेनेतून केसरकरांना निवडून आणण्याचं निश्चित केलं होतं. त्यावेळी केसरकरांना कुठला तरी आधार पाहिजे होता, म्हणून त्यावेळी शिवसेनेनं त्यांना आधार दिला. त्यामुळेच दीपक केसरकर हे आमदार, मंत्री होऊ शकले. मंत्री असताना केसरकरांनी किती जणांना खोके दिले. निवडणुकीच्या वेळी माझ्याकडे पैसे नाही, मी जमीन विकतोय, अस टाहो फोडून सांगतायत. नारायण राणे, शरद पवार, अशा नेत्यांवर टीका करायची आणि संधी साधून घ्यायचे. दीपक केसरकर यांच्यासोबत सावंतवाडी मतदारसंघातील जनता नाही, त्यामुळे केसरकर यांची पायाखालची वाळू सरकली आहे.

    पेटीएमनंतर आता आणखी एक FinTech कंपनी संकटात? सरकारने बजावली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *