• Mon. Nov 25th, 2024
    सहा प्रकारच्या जातीच्या सशांचे पालन; गुजरातसह गोव्यात मोठी मागणी, ‘असा’ सुरु केला व्यवसाय

    सिंधुदुर्ग: कोकणातील तरुण पिढी मेट्रो सिटीमध्ये नोकरीला न जाता व्यवसायामध्ये नवनवे प्रयोग करताना पाहायला मिळत आहे. त्यामध्ये प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्यांची देखील कमी नाही. त्यामुळे कोकणातचं राहून वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करू शकतो, हे कोकणातील तरुण पिढीला हळूहळू कळू लागलं आहे. त्यातून कोकणातील तरुण पिढी व्यवसायामध्ये क्रांती करू पाहत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यामधील निरुखे या खेडेगावामध्ये राहणारे तरुण निलेश गोसावी यांनी बंदिस्त ससा पालन व्यवसाय सुरू केला आहे. निलेश गोसावीचं शिक्षण बीई टेलीकम्युनिकेशन झालेले असून ते एका खाजगी कंपनीमध्ये देखील काम करत आहेत. मात्र निलेश गोसावी यांना व्यवसाय करण्याची मनाशी एक जिद्द होती. तसेच कोणता व्यवसाय करावा याबाबत माहिती घ्यायचे. त्यातूनच ससा पालन करण्याचा व्यवसाय सुरू केला. कोकणात तर पिढीजात पशुपालनाचे वेगवेगळे व्यवसाय सुरू आहेत. त्यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, गायी-म्हशी पालन त्या व्यतिरिक्त नवा व्यवसाय सुरू करायचा होता.
    सिंधुदुर्गातील देवमळ्यात अनोखी देवशेती; ग्रामदैवताचं कौल घेऊनचं नांगरणी, रोप लावणीच्या वेळी शेताला जत्रेचं रूप
    जेणेकरून लोकांना नव्या व्यवसायाची ओळख निर्माण होईल, अशी भावना होती. हा व्यवसाय पाहून त्यांनी सुरू केलं तर त्यांना सुध्दा अर्थाजन होईल. नवनवीन व्यवसाय शोधत असताना मधुमक्षिका पालन, वराह पालन, ससे पालन असे पर्याय समोर आले. त्यामुळे गोसावी यांनी ससा पालन करण्याचा व्यवसाय निवडला. ससा हा प्राणी कोकणाच्या वातावरणात चांगला वाढू शकतो. हे गोसावी यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी माहिती घेऊन हरियाणा येथे प्रशिक्षण घेऊन ससा पालन व्यवसाय सुरू केला.

    हरियाणामधूनच सुरुवातीला दोन ससे गोसावी घेऊन आले. ससा व्यवसाय सक्सेस देखील झाला आहे. या व्यवसायाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. गोसावी यांच्या ससा फार्ममध्ये जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे ससे आहेत. यामध्ये सहा प्रकारच्या जातीचे ससे येथे पाहायला मिळतात. न्युझीलँड वाईट, सोव्हेज चिंचेला, कॅलिफोर्निया, ग्रे जाईंट, ब्लॅक जाईंट,डच या सहा जातीचे ससे आहेत. त्यामध्ये विशिष्ट “अगोरोरा “ही जात आहे ती फक्त केसांसाठी प्रसिद्ध आहे. ती जात कोकणाच्या वातावरणामुळे होत नाही. या सशांना मागणी गुजरात आणि गोवा राज्यात मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुण्यामध्ये देखील मागणी आहे.

    सामान्य शेतकरी ते प्रसिद्ध काजू व्यवसायिक; सिंधुदुर्गच्या विजय कोदेंचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

    ससा हा पाळण्यासाठी, माऊसासाठी आणि लॅबसाठी सुद्धा वापर केला जातो. अशा प्रकारे सेल केला जातो. सशांमध्ये प्रौढ आणि बिडर यांची वजन दोन ते अडीच किलोपर्यंत असतात. ज्यावेळी सशांची पिल्लं जन्माला येतात. त्यावेळी ६० ते ७० ग्रॅममध्ये असतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वजन वाढत असत. महिन्यामध्ये ससा ५०० ते ६०० ग्रॅम एवढ्या वजनाचा होतो. जवळपास दोन महिन्यांमध्ये ९०० ते १००० किलो ग्रॅम वजनाचा होतो. त्यानंतर तीन महिन्यात १५०० ग्रॅम वजनाचा होतो. तीन महिन्यापासूनच विक्रीला तयार होतो. या सशांना खाद्य फ्लावरचा पाला आणि बाहेरून खाद्य मागवावं लागतं.

    त्याचप्रमाणे गायी, म्हैस यांचे मलमूत्र शेतीसाठी उपयोगात येत तसं सशांच देखील मलमूत्र शेतीसाठी उपयोगी येते. हे जैविक खत असल्याचं गोसावी सांगतात. ज्याप्रमाणे शेतीमध्ये किंवा झाडांमध्ये कीटक, जंतू जमिनीमध्ये असतील तर त्या लेंडी,मलमूत्रापासून नष्ट होते. या सशांना मार्केट महाराष्ट्रात देखील आहेत. इतर राज्यात पण मार्केट आहे. जे लॅबसाठी ससे वापरतो त्यांची विक्री पुण्यामध्ये करत असतात. तर गुजरातमध्ये मिठससाठी विक्री मोठी होते. काही वेळा आठवड्याला ५०० ससे देखील दिले आहे. या सशांच्या विक्रीतून जवळपास वर्षाला १० ते १२ लाखापर्यंत फायदा होतो, असे निलेश गोसावी सांगतायत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed