• Fri. Mar 13th, 2026

    राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश

    राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश

    ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला धक्का दिला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटामधील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला आहे.

    शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती धरला आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राहिलेल्या सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशातच भिवंडीतील शिंदे गटातील पदाधिकारी मनसेत गेल्याने शिवसेना-भाजप महायुतीला भिवंडीत मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

    छत्रपती शिवरायांच्या नव्या सिंहासनाचं पूजन, ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा ठरला, उमेदवारही निश्चित
    शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांचे नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहर प्रमुख महिला आघाडी, तालुका प्रमुख महिला आघाडी व शहापूर मधील इतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होत आहे.

    दाऊदला पळवलंय, नगरची गुंडगिरीही मोडू; राऊतांचा जगतापांना इशारा, आता समर्थकाचं प्रत्युत्तर
    सध्या भिवंडीतून भाजपचे खासदार असलेले कपिल पाटील हे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आहेत. तर भिवंडी लोकसभेमध्ये नुकत्याच राष्ट्रवादीत गेलेल्या बाळ्या मामांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांची ताकदही या मतदारसंघात आहे. त्यामुळे आता महायुतीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं आहेत.

    आधी एकमेकांना कोपरखळी, नंतर एकत्र आले पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील

    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed