• Fri. Aug 7th, 2026
    Baramati Crime : गुंगीचं औषध देऊन मारहाण, दृश्यम स्टाईलने जिवंत पतीला पुरण्याचा प्रयत्न, शुद्धीवर येताच घाबरले; बारामतीत पत्नीचा कारनामा

    Baramati Crime News : बारामतीमधील एका महिलेनं तिच्या पतीला गुंगीचं औषध देत बॅटने मारहाण करीत त्याला घरातच पुरून टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    बारामती क्राइम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, पुणे (बारामती) : पुण्यातील बारामती शहरामधील जामदार रोड परिसरात एका 41 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीला औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्यानंतर त्याच्यावर बॅटने हल्ला करण्यात आला. त्यानंतर घरातच बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात त्याला पुरून टाकण्याचाही प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पत्नीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रकाश कान्होबा जगताप (वय 71, रा. ढाकाळे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांची सून शर्मिला प्रविण जगताप (वय 38, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती) हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 109(1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    गॅलरीतच जिवंत पुरण्याचा प्रयत्न

    हा भयानक प्रकार सुदैवाने वेळेत उघडकीस आल्यानं प्रवीण जगताप यांचा जीव वाचला. याप्रकरणी प्रवीण जगताप यांचे वडील प्रकाश जगताप यांनी तत्काळ बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. वडिलांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पत्नी शर्मिला जगताप हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने आपल्या पतीला अशा प्रकारे घरातील गॅलरीतच जिवंत पुरण्याचा कट रचल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

    Maharashtra TimesVikhroli Crime : घरात जाल, तर माझ्यावर अतिप्रसंग करताय म्हणून ओरडेन; विक्रोळीत बापलेकाला संपवलं, जावेने धमकावलं, पण शेजाऱ्यांनी ट्रिक वापरुन पकडलं

    फिर्यादीत काय म्हटलेलं?

    फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, 30 जुलै रोजी रात्री 11.30 ते 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 या कालावधीत ही घटना घडली. आरोपी महिलेनं तिचे पती प्रविण प्रकाश जगताप (वय 41) यांना कोणतेतरी औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्याचा आरोप आहे. त्यानंतर बॅटने मारहाण करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तक्रारीनुसार, हल्ल्यानंतर घरातील हॉललगतच्या गॅलरीत बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात बेशुद्ध अवस्थेतील पतीला झोपवून त्यावर फरशी लावून बंद करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारातून पतीला जिवंत पुरून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या तक्रारीच्या आधारे बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक इंगवले करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा