• Mon. Nov 25th, 2024

    सर्व काही एकतर्फी सुरु, काहींचा हट्ट पुरवण्याचं काम सुरु, छगन भुजबळ यांचे स्वत:च्या सरकारला खडेबोल

    सर्व काही एकतर्फी सुरु, काहींचा हट्ट पुरवण्याचं काम सुरु, छगन भुजबळ यांचे स्वत:च्या सरकारला खडेबोल

    मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी समाजामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. आरक्षण संपलय अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालीय. नोकरी, शिक्षणात हे वाटकेरी होणार आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेत ओबीसी समाजाचे काही जण निवडून यायचे ते पण जाणार, अशी भावना ओबीसी समाजामध्ये आहे. ही भावना आहे, ती चुकीची नाही ,यामध्ये काही चुकीचं वाटत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

    एकीकडे कुणबी प्रमाणपत्र दिली जातात, तीन न्यायमूर्ती काम करतात, दुसरीकडे क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली जाते, राज्य मागासवर्ग आयोगात हवे ते लोक भरले आहेत. सर्वेक्षण सुरु आहे, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावलंय.मराठा समाज मागासवर्गीय आहे, हे सिद्ध करणारा डाटा सुप्रीम कोर्टाला द्यायचा आहे. गायकवाड आयोगानं दिलेला डाटा आधार घेत सुप्रीम कोर्टानं हा समाज मागास नाही असं म्हटलं होतं. त्यामध्ये साखर कारखाने, दूध संस्था, बँका, जिल्हा बँकामध्ये प्रतिनिधीत्व मराठा समाजाचं असल्याचं दाखवत सुप्रीम कोर्टानं नाकारलं होतं, असं छगन भुजबळ म्हणाले.

    छगन भुजबळ पुढे म्हणाले, कुणबी दाखले दिले जाणार, निवृत्त न्यायमूर्ती अभ्यास करणार, सर्वेक्षणाचं काम सुरु राहणार, एकतर्फी कामकाज सुरु असल्याचं मत निर्माण झालंय. सर्व मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याचा प्रयत्न, शपथपत्रावर लाभ देणार हे करताय ते करण्याची गरज काय, असं छगन भुजबळ म्हणाले.

    मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे स्वतंत्रपणे द्या तर क्युरेटिव्ह पिटीशनबाबत आम्ही काही म्हणत नाही, असं भुजबळ म्हणाले. न्या. शिंदे समितीचं काम का सुरु ठेवलंय, त्यांचा पगार साडे चार लाख रुपये कशासाठी दिला जातो. त्यांचा स्टाफ असेल, त्यांचा खर्च आहे कशासाठी, काम झालंय ना मग पैसे का खर्च केले जात आहेत, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

    सगळ्यांना ओबीसीत घ्या हे सगळे हट्ट पुरवण्याचं काम सरकार करतंय. कुणावर अन्याय करणार नाही म्हणता पण ५४ लाख नोदींच्या दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आल्यावर धक्का लागणार आहे. आता कुठलाही फायदा ओबीसींना मिळणार नाही, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक लाभ मिळणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
    जागरण सुरू असताना मंदिराचा स्टेज कोसळला; १७ जण जखमी, एका महिलेचा मृत्यू
    ओबीसी समाजपण मतदान करतो हे विसरता येणार नाही, एक बाजू धरुन मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. सर्वजण मेसेज करुन काय करायचं हे विचारत आहेत.सगळ्या लोकांना बोलावणं शक्य नाही, काही जणांना बोलावलं आहे, पुढं काय करता येईल बाबत विचार करत आहोत. तामिळनाडू सारखं काय करता येईल का, ईडब्ल्यूएसमध्ये १० टक्के वाढवलेलं आहे. महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल, राजस्थानात गुर्जर यांना शांत करण्यासाठी १० टक्के आरक्षण काढलं आहे. बाकीच्या राज्यात इतर समाजांची आंदोलन थांबली आहेत. ईडब्ल्यूएसच्या जागां पैकी ८५ टक्के जागांचा लाभ मराठा समाजानं घेतला आहे.
    नितीशकुमार आज राजीनामा देणार? बिहारमध्ये सत्तांतराच्या हालचालींना वेग, सुशीलकुमार मोदींचे सूचक वक्तव्य
    आमची लढाई ३७४ जातींसाठी आहे.ओबीसींसाठीची भूमिका छगन भुजबळांची आहे, ती कुणाला पटो अथवा न पटो, ३५ वर्ष लढतोय यापुढेही लढणार, असं छगन भुजबळ म्हणाले.
    भाजपची एक अट, नितीश कुमारांसाठी संकट; ‘ते’ पत्र मिळेना, पलटी मारता येईना; नेमकं अडलंय कुठे?
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed