• Sat. Mar 14th, 2026

    बोलणे बंद केल्याने प्रियकराला संताप अनावर, भरदिवसा प्रेयसीवर चाकूहल्ला, नागपुरात खळबळ

    बोलणे बंद केल्याने प्रियकराला संताप अनावर, भरदिवसा प्रेयसीवर चाकूहल्ला, नागपुरात खळबळ

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: बोलणे बंद केल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीवर चाकूने वार केले. ही थरारक घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगर परिसरात घडली. दिवसाढवळ्या शनिवारी दुपारी भर चौकात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. राहुल पुरुषोत्तम काकपुरे (वय २३, रा. धंतोली) असे या हल्लेखोर प्रियकराचे नाव आहे. जखमी १७वर्षीय मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी व राहुलमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुलीने राहुलसोबत बोलणे बंद केले. त्यामुळे राहुल संतापला. शनिवारी दुपारी मुलगी मनीषनगर परिसरातून जात होती. राहुलने तिच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘तू कुठे आहे’, अशी विचारणा केली. मनीषनगर चौकात असल्याचे तिने राहुलला सांगितले. ‘तेथेच थांब’ असे म्हणत राहुलने मोबाइल बंद केला. काही मिनिटांत राहुल तेथे पोहोचला. ‘तू माझ्यासोबत बोलत का नाही’, अशी विचारणा करीत त्याने मुलीसोबत वाद घालायला सुरुवात केली. वाद विकोपाला गेला. राहुलने चाकूने मुलीच्या गालावर वार केले व पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करून राहुलचा शोध सुरू केला. राहुल हा मूळ पुलगाव येथील रहिवासी असल्याचे समजते.

    Chandrapur : एकतर्फी प्रेमात मुलीवर केला चाकूहल्ला मुलीचा गेला जीव

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed