• Sat. Sep 21st, 2024
कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वे मार्गावर धावणार अयोध्या दर्शन ट्रेन, ‘या’ स्थानकांवर थांबा

रत्नागिरी: अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उद्घाटनानंतर आता सगळ्यांनाच अयोध्या दर्शनाची आस लागली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा देशभरातून ओघ सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन देशभरातील ६६ स्थानकांवरून भाविकांना अयोध्या दर्शन घडवण्यासाठी ‘आस्था ट्रेन’ चालवल्या जाणार आहेत.
बिहारमध्ये नितीशकुमार पलटी मारणार? भाजपचे मोदी उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत, JDU एकसंध राहणार की फुटणार?
कोकण रेल्वे मार्गावरील ही संधी प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या गाडीसाठी कोकणातील अनेक रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या विशेष गाड्या आयआरसीटीसीमार्फत चालवल्या जाणार आहेत. यानुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी पहिली गाडी गोव्यातील वास्को जंक्शनवरून १२ फेब्रुवारीला सुटणार आहे. अयोध्येत भगवान प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येऊ लागले आहे. हीच बाब लक्षात घेऊन आयआरसीटीसीमार्फत भाविकांना अयोध्येत घेऊन येण्यासाठी तसेच दर्शनानंतर त्यांना पुन्हा मूळ ठिकाणी पोहोचवण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ अन् खांद्यावर प्रफुल पटेलांना बसवलं : संजय राऊत

कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष गाडी वास्को येथून दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी अयोध्येसाठी निघेल. मजोरडा, मडगाव, करमाळी, थिवी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड ही गोवा तसेच महाराष्ट्रातील स्थानके घेत उत्तर प्रदेशातील अयोध्येकडे रवाना होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed