• Sat. Sep 21st, 2024

नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं

नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मोबाइलवर दुसऱ्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करते, या रागातून संतप्त प्रियकराने प्रेयसीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आळवून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी उघड झाली. रासबिहारी लिंक रोडवरील मोकळ्या जागेत तिचा मृतदेह फेकून प्रियकरासह त्याच्या मित्राने पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत प्रियकराला ताब्यात घेतले. सागर चिवदास तडवी (वय २१, रा. अंबड, मूळ रा. नंदुरबार) असे संशयिताचे नाव आहे.

शहरात नववर्षात पहिल्या खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रियंका वीरजी वसावे (वय २०, रा. नंदुरबार) असे मृत तरुणीचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी मोकळ्या जागेत तरुणीचा मृतदेह आढळल्याचा ‘कॉल’ पोलिसांना आला. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांचे पथक दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आजूबाजूच्या साहित्याची तपासणी करण्यात आली. तरुणीच्या आधार कार्डवरून तिची ओळख पटली. घटनास्थळी पंचनामा केल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिस अंमलदार कैलास शिंदे व संदीप मालसाने यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथक संशयिताच्या घरी पोहोचले. तेथे त्याला ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. पोलिसांनी ‘दणका’ देताच संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

कारमधून मृतदेह आणला

मृत प्रियंका व संशयिताची जुनी मैत्री होती. प्रियंका सध्या छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील एका नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या दरम्यान, संशयित व तरुणीत प्रेम निर्माण झाले. मात्र, प्रियंका दुसऱ्याशी चॅटिंग करते, या कारणातून सोमवारी (दि. २२) रात्री दोघांमध्ये वाद झाले. प्रियंका संशयिताच्या घरी होती. तेथे त्याने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर मित्राच्या सहाय्याने तिचा मृतदेह कारमध्ये टाकला. अंबड परिसरातून उड्डाणपूलमार्गे राबबिहारी लिंक रस्त्यावरील एका लॉन्सशेजारील मोकळ्या जागेत फेकून दिला. या प्रकरणी पंचवटी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

नगरमध्ये ट्रॅक्टर, एसटी आणि इको कार एकमेकांवर आदळल्या, भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed