वसई रेल्वे स्थानक परिसरात ही घटना सोमवारी रात्री ८.५५ वाजता घडली. अपघातानंतर तातडीने आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी ५५,००० रुपयांची मदत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुढील १५ दिवसांत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना सानुग्रह अनुदान आणि इतर देयके वितरीत केली जातील. सचिन वानखेडे आणि सोमनाथ यांच्या कुटुंबाला अंदाजे ४० लाख आणि वासू मित्राच्या कुटुंबाला सुमारे. १.२४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. या रकमेव्यतिरिक्त, मृत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना सेटलमेंट रक्कमी (DCRG, GIS, रजा रोखीकरण) तडजोडीच्या थकबाकीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
चौकशीची घोषणा
या अपघाताप्रकरणी पश्चिम रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी घोषित केली आहे. पश्चिम रेल्वेवरील वसई स्थानकात झालेल्या अपघातात तिघांनी जीव गमावला असून आता या प्रकरणात चौकशीची घोषणा करण्यात आली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News