• Mon. Nov 25th, 2024

    मैत्रीण पाण्यात पडली; वाचवण्यासाठी तरुणाची उडी, मात्र घडलं भलतचं, कुटुबांच्या आक्रोशानं मन सुन्न

    मैत्रीण पाण्यात पडली; वाचवण्यासाठी तरुणाची उडी, मात्र घडलं भलतचं, कुटुबांच्या आक्रोशानं मन सुन्न

    पुणे : पुण्याच्या पानशेत धरण परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पानशेत धरणाजवळ असलेल्या पुलाजवळ धरणात अठरा वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणींना वाचवण्याच्या नादात त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (१८) असे या मृत तरुणाचे नाव आहे. अचानक घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
    अटल सेतूवर पहिला अपघात; नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार दुभाजकाला धडकली, पाहा व्हिडिओ
    आज रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. आयुष्य सुरू होण्याच्या अगोदरच त्याने मृत्यूला कवटाळले असल्याची भावना परिसरातील नागरिकांडून व्यक्त करण्यात येत होती. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास पुण्यातील खराडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी पानशेत धरण परिसरात आला होता. मात्र फिरायला आल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. मात्र त्या पाण्यात पडल्याचे पाहून ज्ञानेश्वर याने पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

    एकाच झाडाला टोमॅटो अन् बटाटे, कमी जागेत जास्त उत्पन्न; बारामतीत अफलातून प्रयोग, वेधलं राज्याचं लक्ष

    ज्ञानेश्वरच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वेल्हे पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या घटनेने खराडी परिसरावर शोककळा पसरली आहे. मित्र आणि मैत्रिणींनी फिरायला जाताना पाण्याच्या कडेला जाऊ नये. जर पोहायला येत नसेल तर पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये, फिरायला जाताना काळजी घेऊन जावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा धरण क्षेत्रात असणाऱ्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed