• Mon. Nov 25th, 2024
    तरुणांना बँकेत संधी दिली पाहिजे, पण वयस्कर लोक संधी देत नाहीत, दादांचे टोमणे थांबेना

    पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या मुळावर घाव घालण्याची एक संधी सोडत नाही. शरद पवार यांना आपलं वय काढलेलं आवडत नाही असं स्वतः शरद पवारांनीच जाहीरपणे अनेकदा बोलून दाखल आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेकदा कोणता ना कोणत्या विषय काढत शरद पवार यांना वयाची आठवण करून देतात. आज देखील पुण्यात एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य करत तरुणांना वयस्कर लोक संधी देत नाही, असं म्हणत शरद पवार यांना अप्रतेक्षपणे टोला लगावला आहे.
    वेध लोकसभा निवडणुकीचा : ठाकरेंचे पाठीराखे संजय जाधव यांचा कस लागणार, महायुतीत ‘रेस’, परभणीत चित्र काय?
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडानंतर अनेकदा शरद पवार यांचा वय काढलं आहे. बंड केल्याच्या दिवशी देखील जाहीर सभेत देखील वयाचा उल्लेख करत आपण थांबलं पाहिजे, असं म्हणत बोचरी टीका देखील केली होती. त्यानंतर रायगड येथे कार्यक्रमात देखील शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली होती. नुकतेच काल परवा एका कार्यक्रमात पुन्हा वयाचा उल्लेख करत आपण आता थांबलं पाहिजे, असा वारंवार सल्ला देत अजित पवार टीका करत आहे. आज देखील बँकेच्या संबंधीत कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, तरुणांना काम करण्याची संधी आपण दिली पाहिजे. तसेच बँकांमध्ये तरुणांना संधी दिली पाहिजे. नाहीतर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाहीत. असा अप्रत्यक्ष टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना लगावला आहे.

    कलेक्टर काय झोपा काढतायेत का?, बच्चू कडूंनी थेट विभागीय आयुक्तांना फोन करून धारेवर धरलं

    पुणे मर्चंटस को-ऑप बॅंक लिमिटेडच्या शतक महोत्सवात वर्षाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने अजित पवार हे मुख्य अतिथी होते. दरम्यान बँकेच्या वरिष्ठ पदा संदर्भात बोलत असताना त्यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. यावेळी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे, आमदार सुनील टिंगरे, अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, आणि बँकेचे संचालक मंडळी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *