• Mon. Nov 25th, 2024
    प्रणिती शिंदेंच्या नाकावर टिच्चून प्रकल्प पूर्ण केला, आडम मास्तर प्रणिती शिंदेंवर खवळले

    सोलापूर : सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘रे नगर’ गृहप्रकल्प साकारला आहे. दोन लोकसभा निवडणुका झाल्या, दोन विधानसभा निवडणुका झाल्या मात्र तरीही रे नगर गृहप्रकल्पाचं काम सुरूच राहिलं. पण आता बांधकाम पूर्ण झालं असून पंधरा हजार घरं सर्वसामान्य नागरिकांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी वितरित केली जाणार आहेत.

    माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी रे नगर गृहप्रकल्प साकारण्यासाठी जवळपास तेरा वर्षे मेहनत घेतली. २०१९ साली या रे नगर गृहप्रकल्पचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः याच्या उद्घाटनासाठी येणार, अला शब्द मोदींनी दिला होता, त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. शुक्रवारी १९ जानेवारी रोजी त्यांच्या हस्ते घरांचं वितरण होणार आहे.

    मोदींच्या दौऱ्यापूर्वी चंद्रकांतदादा सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीला; ‘त्या’ गौप्यस्फोटामुळे राजकीय भूकंपाचे संकेत
    हा प्रकल्प साकारताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. विद्यमान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी खूप अडचणी आणल्या होत्या. २०१९ साली विधानसभा निवडणुकीत रे नगर गृहप्रकल्पाविरोधात खोटा प्रचार केला होता. महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना देखील माझ्या विरोधात खोटी माहिती सांगून फंड रोखला होता. पण सोलापुरातील शिंदेशाहीला टक्करदेत त्यांच्या नाकावर टिच्चून रे नगर गृहप्रकल्प अंतिम टप्प्यात मी आणला, अशी टीका माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम यांनी शिंदे कुटुंबियांवर केली.

    मला भाजप प्रवेशाची ऑफर कुणी दिली त्याचं नाव सांगणार नाही, पण मी काँग्रेसच्या विचारांचा, पक्ष सोडणार नाही : सुशीलकुमार शिंदे
    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी सोलापुरात राजकीय अस्थिरता

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी १९ जानेवारी रोजी सोलापूर दौरा आहे. मोदींचा दौरा होण्याअगोदर सोलापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप प्रवेशासंबंधी ऑफर आहे असा गौप्यस्फोट केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे सोलापुरात राजकीय अस्थिरता आहे.

    मला भाजपची ऑफर, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट; महाजन म्हणाले, स्वागतच करू; नाना खवळले
    मोदींच्या दौऱ्यामुळे भाजपमय वातावरण

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहे. मोदींच्या दौऱ्याचा मोठा प्रचार सुरू आहे. राज्यातील व जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी बैठकांवर बैठक घेत आहेत. सोलापुरातील राजकीय वातावरण भाजपमय झाले आहे. काँग्रेसचे नेते आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झटत असताना, नरेंद्र मोदी यांचा दौरा, माकप नेते नरसय्या आडम यांनी काँग्रेस विरोधात केलेलं आरोप त्यामुळे सोलापुरात राजकीय वातावरण तापलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *